मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सर्वत्रच सुरु आहे. कोरोना विषाणूने अनेकांचा जीव घेतला असून काहींनी यावर यशस्वी मात केली आहे. तसेच आता लोकांच्या शरीरात काही प्रमाणात कोरोनाशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार व्हायला सुरूवात झाली आहे.
सध्याच्या वैद्यकीय अभ्यासानुसार असे म्हणतात की, कोरोना विषाणूंविरूद्ध प्रतिकारशक्ती ८ महिने टिकते. मात्र काही लस उत्पादक असा दावा करतात की, त्यांच्या लसीपासून प्रतिकारशक्ती बर्याच वर्षांपर्यंत राहिली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य तज्ज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
याबाबत बोलताना ते म्हणतात, ‘कोरोना विषाणूने जगाचा नाश केला आहे. आशा होती की, लोकांच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती विकसित होईल आणि आजारांशी लढत असलेल्या एंटीबॉडीज विकसित होतील. ७० ते ८० टक्के लोकांच्या शरीरात एंन्टीबॉडीज तयार होणार नाही तोपर्यंत हा विषाणू एका व्यक्तीकडून इतर व्यक्तीपर्यंत पसरत राहील.’
याचबरोबर हा कोरोना व्हायरस काय करीत आहे यावर लक्ष ठेवले पाहिजे. तो या अँटीबॉडीजपासून पळायला शिकत आहे काय? म्हणूनच लसीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, जे वेगवेगळ्या प्रोटिन्सना लक्ष्य करीत आहेत. आम्ही यावर काम करत असल्याचे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.
१६ जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार…
देशभर येत्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज ३ कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल. यामध्ये तब्बल २७ कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शेतकरी आंदोलन! …म्हणून सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला झापलं; राजू शेट्टी बरसले
किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला ‘हा’ गंभीर आरोप; थेट निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
‘सीरम इंस्टिट्यूट’ला मिळाली केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर; किंमतही केली जाहीर