धक्कादायक! कर्म पूजेदरम्यान विसर्जनासाठी गेलेल्या ७ मुलींचा तलावात बुडून मृत्यू

झारखंडचा लातेहार जिल्ह्यामधून एक दुःखद घटना समोर आली आहे. 18 सप्टेंबर रोजी शेरेगडा पंचायतीच्या बुक्रू गावात आठ लोक, जे कर्म पूजा उत्सव साजरा करत होते, त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात मुलींचा समावेश आहे.

प्रथेप्रमाणे प्रत्येकजण जवळच्या तलावात विसर्जनासाठी गेला होता. या संपूर्ण घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शोक व्यक्त केला आहे. दुसरीकडे गावातील लोकांनी प्रशासनाचा निषेध केला. ते म्हणतात की खाणकाम केल्यामुळे तलावाचे आणखी रुंदीकरण झाले.

एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यु झालेल्या मुली 12 ते 20 वर्षांच्या होत्या. त्या ‘करम डाली’च्या विसर्जनासाठी तलावात गेल्या होत्या. दरम्यान, दोन मुली बुडू लागल्या आणि त्या मदतीसाठी ओरडल्या.

इतर मुलींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. गावकरीही धावले आणि तलावाजवळ पोहोचले. पण ते मुलींना वाचवू शकले नाहीत.पलामू रेंजचे आयुक्त जटाशंकर चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, “मुलींनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. चौघींचा जागीच मृत्यू झाला. बाळूमठ सीएचसीकडे जात असताना तिघींचा मृत्यू झाला. ”

मरण पावलेल्या मुलींपैकी तीन सख्या बहिणी होत्या. रेखा कुमारी, लक्ष्मी कुमारी आणि रीना कुमारी. याशिवाय सुषमा कुमारी, पिंकी कुमारी, सुनीता कुमारी, बसंती कुमारी आणि सूरज यांनीही आपला जीव गमावला. कर्मा हा झारखंडचा प्रमुख सण आहे. निसर्गाची पूजा करण्याच्या हेतूने हा सण साजरा केला जातो.

या घडामोडीवर शोक व्यक्त करताना पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले, “झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात बुडून लहान मुलांनी आपला जीव गमावला. या घटनेने मला धक्का बसला आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझी संवेदना आहे. ”

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही दु: ख व्यक्त केले. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “लाटेहार जिल्ह्यातील शेरेगडा गावात करम डाली विसर्जनादरम्यान बुडालेल्या सात मुलींच्या मृत्यूबद्दल ऐकून धक्का बसला. ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि शोकसंतप्त कुटुंबियांना दु: ख सहन करण्याची शक्ती देवो.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या संपूर्ण घटनेमुळे संतप्त लोकांनी एनएच 98 ब्लॉक केले. खाणकामामुळे तलाव रुंद झाला, त्यामुळे हा दुःखद अपघात झाला, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्याविषयी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले आणि त्यांनी हायवे उघडला.

महत्वाच्या बातम्या
भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील; संजय राऊतांचा भाजपला टोला
बाॅलीवूडची क्वीन कंगणा भिडली थेट हाॅलीवूड स्टार्सला; चोरीवरून थेट फटकारले
एक्सप्रेस हायवे नरिमन पाॅइंटपर्यंत न्हेनार; नितीन गडकरी सुसाट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.