६० वर्षीय आजोबांचा दुसऱ्या लग्नासाठी शोलेस्टाईल हट्ट, विजेच्या खांबावर चढून केला गोंधळ

तुम्ही शोले चित्रपट पाहिला असेल तर त्यामध्ये वीरू बसंतीसोबत लग्न करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढतो आणि खुप गोंधळ करतो. हे तुम्ही पाहिलं असेल. चित्रपटात जसं घडते तसे खऱ्या आयुष्यातही घडले आहे. त्यामुळे ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

काही दिवसांपुर्वी एक घटना समोर आली होती ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीला कंटाळून विजेच्या खांबावर चढला होता. आता पुन्हा तशीच घटना समोर आली आहे. राजस्थानच्या एका गावात ६० वर्षीय वृद्ध दुसऱ्या लग्नासाठी चक्क दुसऱ्या लग्सासाठी विजेच्या खांबावरच चढला.

धौलपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. त्या वृद्धाला आधीच तीन मुले आणि २ मुली आहेत. या सर्वांचे लग्न झाले आहे. त्यांनादेखील आता मुले झाली आहेत. त्या वृद्धाच्या पत्नीचे ४ वर्षांपुर्वी निधन झाले आहे. त्यामुळे ते आता एकटे पडले आहेत.

आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांना दुसरे लग्न करायचे आहे. पण त्यांचे कुटुंब यासाठी नकार देत आहे. त्यामुळे त्यांनी दुसरे लग्न करण्याचा हट्ट धरला आहे आणि आपली इच्छा पुर्ण करण्यासाठी आजोबा थेट विजेच्या खांबावरच चढले.

त्यांनी कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा ते विजेच्या खांबावर चढले तेव्हा सुदैवाने वीज बंद होती. ही बातमी वाऱ्यासारखी पुर्ण गावात पसरली. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ इलेक्ट्रिक कनेक्शन कापले.

गावातील नागरिकांनी आजोबांची समजूत काढली आणि त्यांना खाली उतरवले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे. सध्या सगळीकडे या घटनेचीच चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या
ऍपल प्रेमींनो! १० हजारापेक्षा कमी किंमतीत घ्या iphone 6 आणि 6s, जाणून घ्या कोठे मिळतायत..
रेखाला पाहून शशी कपूर झाले होते शॉक; म्हणाले, ही काळी अभिनेत्री कशी बनणार?
बिकनी घातलेल्या अभिनेत्रीसोबत फोटोशूट अमिताभला पडले होते महागात; घरातून बाहेर पडणे झाले होते कठिण
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत करणार, अजित पवारांची घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.