भाजपला खिंडार! खडसेंची भाजपवर पहिली ‘सर्जिकल स्ट्राईक’, ६० जण राष्ट्रवादीत दाखल

मुंबई | भाजपवर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला जळगावमध्ये खिंडार पडले आहे. जळगाव जिल्ह्यातील ६० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला राम राम ठोकला आहे.

रावेर तालुक्यातील ६० भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

याचबरोबर खडसे यांच्यामुळे जळगाव हा भाजपला बालेकिल्ला होता. मात्र आता खडसे यांनी भाजपची साथ सोडण्याने आता मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात इन्कमिंगला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…
जळगाव जिल्ह्यातील मोठे व्यक्तीमत्व आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे. तसेच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे
१९८८ – कोथळी गावचे सरपंच झाले.
१९८९ – मुक्ताईनगर चे आमदार बनले.
१९९७ – भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री बनले.
२००९ – विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
२०१४ – भा.ज.प. सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री बनले.
२०१६ – महसूल मंत्रिपदावरून राजीनामा दिला.
२०२० – भारतीय जनता पार्टी सोडली.
२०२० – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला.

महत्त्वाच्या बातम्या
…तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल- चंद्रकांत पाटील
सुशांत प्रकरणाला वेगळे वळण! ‘या’ व्यक्तीने मुंबई पोलिसांवर केला धक्कादायक आरोप
आरारारारा! बाॅलीवूडची ‘ही’ स्टार अभिनेत्री म्हणतेय मला भूताने झपाटलय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.