पेनी स्टॉक चांगला परतावा देतात. त्यांचा रेकॉर्ड देखील उत्कृष्ट आहे. असे अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्या स्टॉकनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. काही वेळा या समभागांच्या परताव्यावर खुद्द शेअर बाजार आणि सेबीही आश्चर्यचकित होतात. असाच एक स्टॉक Tine Agro या कंपनीचा आहे.( 6 rupees stock give 673% return to )
गेल्या २ महिन्यांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या परताव्यावर ASM ला देखील अर्ज करावा लागला आहे. ३१ डिसेंबर २०२१ रोजी Tine Agro या स्टॉकची किंमत BSE वर फक्त ६.८० रुपये होती. १० मार्च रोजी या स्टॉकची किंमत वाढून ५८.७० रुपयांवर पोहचली आहे. अडीच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या स्टॉकने तब्बल ७६३ टक्के परतावा दिला आहे.
या स्टॉकची किंमत वाढत असताना BSE सेन्सेक्स ४. ७९ टक्क्यांनी घसरला होता. मिळालेल्या माहितीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने ३१ डिसेंबर रोजी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक तशीच ठेवली असती तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य ८.६३ लाख रुपये झाले असते. पण गेल्या 2 दिवसांपासून या स्टॉकची किंमत कमी होत आहे.
आज या स्टॉकची किंमत ५५.८० रुपये आहे. गेल्या दोन सत्रांमध्ये हा शेअर ९.६४ टक्क्यांनी घसरला आहे. अशा समभागांमध्ये गुंतवणूक करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारे झपाट्याने वाढणारे स्टॉक शेअर बाजारात अस्थिर असतात. त्यामुळे त्यांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार जाणवतो.
त्यामुळे अशा स्टॉकमध्ये कष्टाने कमावलेले पैसे बुडण्याचा धोका अधिक असतो. अहमदाबादस्थित या कंपनीच्या शेअर्समधील अस्थिरतेमुळे बीएसईने सध्या त्यावर एएसएम ठेवले आहे. मार्च 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीची विक्री शून्य होती. यानंतर कंपनीने काही तिमाहीत विक्रीचे आकडे नोंदवलेले नाहीत.
रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात सध्या अस्थिरता निर्माण झाली आहे. या काळात मल्टीबॅगर पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. पेनी स्टॉक हे खूप स्वस्त असतात आणि ज्यांचे बाजार मूल्य देखील कमी असते. दीर्घकालीन गुंतवणुकीत पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना मोठा फायदा देतात.
महत्वाच्या बातम्या :-
हवा उतरली! भुबन बड्याकरने ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले, ‘गरज पडली तर पुन्हा शेंगदाणे विकेन’
IPL 2022: RCB ची मोठी घोषणा, विराटच्या जागी ‘या’ खेळाडूकडे दिली संघाची कमान, चाहत्यांना धक्का
VIDEO: अमिताभ यांना विचारला सेक्सी मुलींबद्दल ‘हा’ प्रश्न, अभिषेकने उत्तर देताच करणची बोलती झाली बंद