शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला.

यावर प्रतिक्रिया देताना सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. कंगनाने दिल्लीतील हिंसाचारावर मत व्यक्त करताना शेतकऱ्यांना दहशतवादी आणि खलिस्तानी असे संबोधले होते. या वक्तव्याचा तिला जबर फटका बसला असून सहा ब्रॅण्ड्सनी तिच्यासोबतचे करार रद्द केले आहेत.

तसेच याबाबत कंगनाने ट्वीट करुन माहिती दिली आहे. कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर करु शकत नाही. पण आता मी या राष्ट्रद्रोही ब्रॅण्ड्सना आणि या हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला सांगू इच्छिते की, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे जे समर्थन करताहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत.”

वाचा काय म्हणाली होती कंगना राणावत…
कंगनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने आंदोलक शेतकऱ्यांवर सडकून टीका केली. ‘जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाका. तसेच त्यांची सर्व प्रकारची संपत्ती जप्त केली जावी, अशी मागणी करताना हा देश, याचं सर्वोच्च न्यायालय, इथलं सरकार हे सर्व थट्टा बनून राहिलं आहे,’ अशा शब्दांत कंगनाने आजच्या हिंसाचारावर भाष्य केले.

तसेच ती पुढे म्हणतीये, ‘स्वतःला जे शेतकरी म्हणून घेत आहेत अशा या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देत आहेत. हे खुलेआम होत असून सर्वांच्या समोर हा तमाशा सुरु आहे. जगात आज आपली खिल्ली उडवली जात असेल आपल्याला काहीही इज्जत राहिलेली नाही, आपण केव्हाही अडाण्यासारखे वागतो.’

याचबरोबर ‘दुसऱ्या देशाचे पंतप्रधान भारतात आले तरी आपण नग्न होऊन बसतो. यामुळे या देशाचे काहीही होणार नाही. जर सर्वकाही असंच सुरु राहिले तर कोणी देशाला दहा पाहलं पुढे नेऊ पाहत असेल तर तो वीस पावलं मागं आणण्याचं काम केलं जात आहे आणि आपण सर्वजण केवळ तमाशा पाहत आहोत,’ असे कंगनाने म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आमदाराचा राजीनामा; केले ‘हे’ गंभीर आरोप
‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तेच वातावरण तयार केलं’
दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या आरोपाने उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.