मोठी ऑफर! १४ हजारांचा 5G स्मार्टफोन मिळतोय ६९९ रुपयांना, जाणून घ्या…

सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आणल्या जात आहेत. आता स्मार्टफोनवर देखील अनेक ऑफर आहेत. तुमचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आहे. या ऑफरमध्ये तुम्ही १३,९९९ रुपयांचा फोन अवघ्या ६९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

यामुळे ही एक मोठी संधी आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे. फ्लिपकार्टवरुन तुम्ही ही खरेदी करू शकता. या फोनचे नाव Realme 8 5G असे आहे आणि त्यात अनेक कमालीचे फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 128 जीबी पर्यंतच्या ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो.

यामध्ये डायनॅमिक रॅम एक्सपेंशन डीआरई तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जो बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. Flipkart वर देण्यात आलेल्या माहितीनुसार 4GB RAM आणि 64GB स्टोरेजवाल्या फोनची किंमत 13,999 रुपये इतकी आहे.

या फोनवर 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. त्यानुसार जर एखादा ग्राहक त्याचा जुना फोन देऊन संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा फायदा घेण्यास पात्र ठरला तर हा फोन 699 रुपयांमध्ये मिळणार आहे. यामुळे ही मोठी संधी आहे.

यामध्ये सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी या Realme 8 5G फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ज्यामध्ये f / 2.1 लेन्सचा वापर करण्यात आला आहे. या फ्रंट कॅमेरामध्ये पोर्ट्रेट, नाइटस्केप आणि टाइमलॅप्स फीचर देण्यात आले आहे.

रियर कॅमेरा सेटअपला नाईटस्केप, 48M मोड, प्रो मोड, AI स्कॅन आणि सुपर मॅक्रोसारखे फीचर्स जोडलेले आहेत. फोनमध्ये डीआरई तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे जो स्मूद मल्टीटास्किंगसाठी बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करतो.

ताज्या बातम्या

कोरोनाची लस घेणाऱ्यांसाठी खास ऑफर; देत आहेत, कार, सोने आणि आयफोन

VIDEO; पंगा गर्ल कंगनाची पुन्हा चर्चा रंगली, भर पावसात करतेय जबरदस्त घोडेस्वारी

‘तू चूकीच्या माणसाशी पंगा घेतला, तुझे करीअर संपवल्याशिवाय राहणार नाही’; सलमानला धमकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.