कोरोनाने मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार ५० हजार; घोषणा मोदींची, पैसे मात्र राज्यांचे

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले होते. गेल्या दीड वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. अशात हजारो लोकांनी कोरोनामुळे जीवही गमावला आहे. आता ज्या लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे, त्या लोकांच्या कुटुबियांना केंद्र सरकार ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कोरोना मृत्युसाठी ५० हजारांची भरपाई दिली जाईल, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने सर्वाच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. सुरुवातीला नुकसानभरपाईची रक्कम ठरवण्यासाठी तसेच नियमावली बनवण्यासाठी केंद्र सरकारने चालढकल केली होती.

त्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्राने आज आपली बाजू मांडली आहे. पण भरपाईची रक्कम देण्याची जबाबदारी राज्यांवरच ढकलली आहे. कोरोना मृत्युसाठी राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे भरपाईची रक्कम दिली जाईल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

कोरोना कुटुंबियांची ४ लाखांची मदत भरपाई देण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभुमीवर आता एनडीएनने तयार केलेल्या या मार्गदर्शक तत्वांवर लोकांकडून नाराज व्यक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये अनुग्रह रक्कम दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्युंसाठी एक्स-ग्रेशिया रकमेबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार, राज्यआपत्ती निवारण निधीतून ५० हजार रुपये दिले जाणार असल्याचे म्हटले आहे.

प्रतिज्ञापत्रात म्हटले की, एक्स-ग्रेशियाची रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून दिली जाईल. नुकसान भरपाई धोरण तयार करण्याव्यतिरिक्त, न्यायालयाने मृत्युच्या प्रमाणपत्रात मृत्युचे कारण नोंदवण्यासाठी एक यंत्रणा बनविण्यासही सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या-

“रोई ना जे याद मेरी आई” शहनाजच्या त्या गाण्यामुळे प्रेक्षक झाले भावूक…सिद्धार्थच्या आठवणी झाल्या पुन्हा ताज्या
साडी घातली म्हणून महिलेला हाॅटेलबाहेर काढले; दिल्लीतील संतापजनक प्रकार
मुलीच्या हातावरचे टॅटू पाहून घरमालक घाबरला आणि तिला घरातून काढले बाहेर, वाचा संपुर्ण प्रकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.