मदतीचा ओघ सुरू! दीड लाख अधिकाऱ्यांचा २ दिवसांचा ५० कोटी रूपये पगार मुख्यमंत्री निधीला

मुंबई । राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस तीव्र रूप धारण करताना दिसत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती देखील अडचणीत आली आहे. सर्वकाही ठप्प असल्याने आर्थिक चणचण भासू लागली आहे.

या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी राज्यातील अ व ब वर्गातील दीड लाख अधिकाऱ्यांनी एप्रिल व मे महिन्यातील प्रत्येकी एक दिवसाचे असे एकूण दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

या अधिकाऱ्यांच्या वेतनातून पैसे कापून ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात यावेत, असे पत्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

यामुळे काहीसा निधी उपलब्ध होणार आहे. कोरोनावर उपाययोजनांसाठी दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून ५० कोटी रुपयांचा निधी कोरोनावरील उपाययोजनांसाठी खर्च केला जाणार आहे.

गेल्या वर्षभरापासून राज्यातील व्यवसाय बंद आहेत. उधोग ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये निधी जमा करणे राज्य सरकारला अवघड झाले आहे. केंद्र सरकारकडून देखील निधीची अपेक्षा आहे.

केंद्राकडून जीएसटीचे पैसे देखील अजून आले नाहीत, यावरून देखील आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, यामुळे अनेकजण मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देऊन मदत करत आहेत. उद्योजक, कलाकार, खेळाडू देखील मदत करत आहेत.

ताज्या बातम्या

स्विफ्ट, डिझायर, वॅगनआर मिळवा फक्त दोन लाखांत; मारूती सुझुकी कंपनीने दिला स्वस्त पर्याय

दुबईच्या खोलीमधून नेहाचा हनिमूनचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मिडीयावर धुरळा

नेहाने धुपीयाने मुलीला स्तनपान करतानाचा ‘तो’ फोटो केला शेअर अन् ट्रोलर्सची चांगलीच जिरवली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.