मानवतेपेक्षा मोठा धर्म नसतो! ऐन रमजानात मशिदीतच उभारले ५० बेड्सचे कोव्हिड सेंटर

देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. असे असताना महाराष्ट्रातसह गुजरातमध्ये देखील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे. अनेक रुग्णांचा मृत्यू रोज होत आहे.

गुजरातमधील वडोदऱ्यामधील रुग्णसंख्या लक्षात घेता येथील मशिदीमधील व्यवस्थापनानेच सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जहांगीरपूर येथील मशीदमध्येच मशीद व्यवस्थापनाच्या पुढाकाराने ५० खाटांचे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता असल्याने आम्ही मशिदीमध्ये कोव्हिडी सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. रमजानच्या महिन्यात यापेक्षा अधिक पवित्र कोणते काम करता येईल, अशा शब्दांमध्ये या मशिदीच्या ट्रस्टींनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

या ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन, जेवण, नाश्ता यासह इतर लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे रुग्णांची गैरसोय होत नाही. यामुळे या कामाचे कौतुक केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्ये देखील ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत. अनेक रुग्णांवर रोडवर उपचार घेण्याची वेळ आली आहे.

यामुळे अनेकजण मदतीसाठी येत आहेत. अध्या मुस्लिम समाजाचा पवित्र महिना महत्वाचा सण म्हणजे रमजान महिना सुरू आहे. यामध्ये मशिदीमध्ये लोक जात असतात, मात्र तरी देखील मशिदीमध्ये कोविड सेंटर सुरू केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.