जबडा तुटल्यामुळे हत्तीचा झाला मृत्यू; फटाक्यांनी भरलेले फळ किंवा नारळ खाल्ल्याचा संशय

 

पलक्कड | काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एका गर्भवती हत्तीनीचा मृत्यू झाला होता. केरळमध्ये पुन्हा एकदा शुक्रवारी पाच वर्षाच्या हत्तीचा मृत्यू झाल्याची अशीच एक घटना समोर आली आहे.

वनाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीचा जबडा तुटलेल्या अवस्थेत मिळाला. या हत्तीला काही खाता येत नसल्यामुळे कमजोर होऊन याचा मृत्यू झाला आहे.

मुख्य वनरक्षक सुरेंद्रकुमार यांनी हत्तीने फटाक्यांनी भरलेले फळ किंवा नारळ खाल्ल्यामुळे त्याचा जबडा तुटला असल्याची शंका व्यक्त केली आहे.

हत्तीचा मृत्यू मागे पोटामध्ये असलेला ट्यूमर कारणीभूत आहे का किंवा त्याला निमोनिया झाला होता का हे पाहण्यासाठी हत्तीचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.