IPL 2020: ‘हे’ तीन संघ प्ले ऑफमध्ये फिक्स, पण चौथ्या स्थानासाठी संघर्ष कायम

दुबई | IPL 2020 मध्ये सगळे संघ प्ले ऑफ मध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही संघांची प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची शक्यता कमी आहे. पहिले ४ संघ प्ले ऑफ मध्ये जागा फिक्स करतील पण ते चार संघ कोणते असतील यावर सगळ्यांचे लक्ष आहे.

पहिले तीन संघ आपल्याला मिळाले आहेत पण एका जागेसाठी ५ संघामध्ये संघर्ष सुरू आहे. दिल्ली सध्या पहिल्या स्थानावर आहे. १४ गुणांसह दिल्लीने पाहिले स्थान टिकवून ठेवले आहे.

दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आहे. दोन्ही संघांचे अनुक्रमे १२ गुण आहेत. त्यामुळे हे तिन्ही संघ प्लेऑफसाठी निश्चित झाले आहेत. तसे पाहिले तर चौथ्या स्थानावर कोलकत्ता नाईट रायडर्स आहेत.

कोलकाताकडे ८ गुण आहेत. आणि त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद या सगळ्यांचे ६ गुण आहेत. प्ले ऑफसाठी सनरायजर्स आणि कोलकाता यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. चेन्नई, राजस्थान आणि पंजाब या तिन्ही संघांना प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. प्ले ऑफमध्ये जागा मिळणे त्यांच्यासाठी कठीण आहे.

दरम्यान, चेन्नईने ९ मधले तीन सामने जिंकले आहेत, तसेच पंजाबने कितीही हातपाय हलवले तरी ते प्ले ऑफमध्ये जाऊ शकत नाहीत. आणि सनरायजर्सचं बोलायचं झालं तर त्यांना संधी आहे पण त्यांचा रन रेट कमी आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.