५ रूपयांचे एक नाणं बनवेल तुम्हाला लखपती; कसं ते वाचा…

 

कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांना पैश्यांची गरज आहे. अश्यातच सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही घर बसल्या लाखो रुपये कमवू शकता. आता ते कसं? तुमच्याकडे ५ आणि १० रूपयांची नाणी असायला हवीत.

आपल्याकडे माता वैष्णोदेवीची ५ आणि १० रुपयांची नाणी असल्यास आपण ते विकून पैसे कमवू शकता. ही नाणी २००२ मध्ये जारी करण्यात आली होती. देवीच्या चित्रामुळे लोक या नाण्यांना खूप भाग्यवान मानत आहेत. हिंदू धर्मात माता वैष्णो देवीची पूजा केली जाते. त्यामुळे अशा नाण्यांसाठी लोक कोट्यावधी रुपये खर्च करीत आहेत.

इंडियामार्टच्या वेबसाइटवर जुन्या नोटा आणि नाणी यांचा लिलाव केला जात आहेत. आपल्याला जुन्या वस्तू गोळा करण्याची हौस असल्यास, आपला हा छंद आपल्याला लक्षाधीश देखील बनवू शकतो. यासाठी तुमच्याकडे १० किंवा ५ रुपयांची नाणी हवी आहेत की ज्यावर वैष्णो मातेचा फोटो बनविला गेला आहे. आपण या कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन ते विकू शकता. त्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपयेही मिळू शकतात.

या नाण्यांची लिलावात विक्री करुन आपण १० लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता. याशिवाय या नाण्यांच्या बोली दरम्यान आपण मोलभाव देखील करू शकता. तुमच्याकडे जर असेच एखादे जरी नाणं असेल तर तुम्ही ते लिलावात विकून १० लाख रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता.

आपल्याला या पुरातन नाण्यांचे फोटोस वेबसाइटवर अपलोड करावे लागेल, ज्यानंतर लोकं आपल्या या नाण्यासाठी पैशांच्या बोली लावतील आणि आपण ज्या किमतीला हवे त्या किमतीला हे नाणे विकून आपण लाखो रुपये कमावू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

अखेर मुहूर्त ठरला? पवारांच्या संकेतानंतर खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या हालचालींना वेग

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चंद्रकांत पाटील, म्हणाले…

‘हे’ कार्ड असल्याशिवाय मिळणार नाही कोरोना लस; पंतप्रधानांनी दिले संकेत

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.