सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; बजेटच्या दिवशीच बदलणार ‘या’ गोष्टी…

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आर्थिक वर्ष २०२१ – २२ साठी सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. सर्व सामान्यांचे लक्ष सध्या या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. मात्र अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

गॅसचे दर बदलणार –
आज गॅसचे नवीन दर जाहीर होणार आहेत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये तसेच व्यवसायिक स्तरावरील गॅस वापराचे दर बदलतात.

एटीएममधून रोख रक्कम काढता येणार नाही –
आजपासून पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठा बदल करण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना ईएमव्ही नसणाऱ्या एटीएम मशीन्समधून पैसे काढता येणार नाहीत.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात –
आजपासून एअर इंडिया एक्सप्रेसने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाणांची घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेस फेब्रुवारी महिन्यापासून २७ मार्चपर्यंत त्रिची आणि सिंगापूरदरम्यान रोज उड्डाण घेणार आहे.

या वस्तूंच्या किंमती कमी होणार –
एक फेब्रुवारी २०२१ रोजी मोदी सरकार या अर्थसंकल्पामध्ये वस्तूंवर आकारण्यात येणारे सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी कमी करणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये फर्निचरसाठी लागणारा कच्चा माल, तांब्याच्या भंगारातील वस्तू, काही रसायने, दूरसंचार क्षेत्राशीसंबंधित उपकरणे, रबर उत्पादने, पॉलिश हिरे, रबराचे सामान, चामड्यापासून बनवलेले कपडे, कार्पेट यासारख्या २० हून अधिक वस्तू स्वस्त होण्याचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाकाळात पाच महीने घरी बसूनही तुम्हाला पगार दिला, आता जरा दुसऱ्यांच्या वेदनांचा विचार करा
‘अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती’, बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केली नाराजी
‘धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.