बातमी कामाची! ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान; असा करा अर्ज

मुंबई | भारतात शेतीला खूप महत्व दिले जाते. सरकारही शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. देशातील एक खूप मोठा वर्ग कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकार नेहमी तत्पर असते.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कृषी यांत्रिकीकरण राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची अवजारे अनुदान तत्वावर दिली जातात. यांमध्ये पावर विडर, कल्टीवेटर, पलटी नांगर, शुगर केन फ्रेश कटर, मिनी राईस मिल, मिनी डाळ मिल इ.अवजारे आहेत.

जाणून घ्या योजनेविषयी…
या योजनेतून ट्रॅक्टरसाठी दोन लाखांपासून ते पाच लाखापर्यंत अनुदान देत आहे. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या इतर अवजारांना देखील बारा हजार रुपयांपासून ते तीन लाखांपर्यंतच्या अनुदान दिले जाते. यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना आणखी फायदा होणार आहे.

राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा या योजनेत समावेश केला असून इथल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळे आहे.  तसेच अधिक याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी krushi -vibhag या लिंक वर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकतो.

असा करा अर्ज…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी  https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. शेतकरी कुठूनही आपले सरकार डीबीटी पोर्टल वरून कृषी यांत्रिकीकरण योग्य साठी अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे..
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. यामध्ये सातबारा उतारा, ८ अ उतारा, आधार लिंक असलेले बँक पासबुक, आधार कार्ड, विकत घेतात असलेल्या यंत्र अवजारांचा मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, आकाराचे फोटो इ. कागदपत्रांची आवश्यकता असते.

महत्त्वाच्या बातम्या
वॉर अँड पीस! आत्मह.त्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट
‘ही’ कंपनी म्हणतेय आमची लस आहे कोरोनावर १००% प्रभावी; पहा कोणती आहे ती कंपन‘हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.