जगातील ५ असे घटस्फोट जिथं पत्नी वेगळी झाल्यानंतर बनली अब्जाधिश आणि नवरा झाला थोडा गरीब

अनेकदा पती-पत्नीमध्ये वाद विवाद होत असतात. पण पुन्हा काही दिवसांनी दोघांमधले नाते पहिल्यासारखे होऊन जाते. मात्र काही वेळा वादविवाद इतके टोकाचे होतात, की पती पत्नीला घटस्फोट घ्यावा लागतो. घटस्फोटानंतर पतीला आपल्या संपत्तीचा काही भाग पत्नीला द्यावा लागतो.

आजपर्यंत अनेक श्रीमंत व्यक्तींचे घटस्फोट झाले आहेत. त्यामुळे त्या लोकांना आपल्या पत्नीला करोडोंची संपत्ती द्यावी लागली आहे. आपण अशा ५ घटस्फोटांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या घटस्फोटामुळे पत्नी या अब्जाधिश लोकांच्या यादीत आल्या आहे, तर पतीला मात्र मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

१.जेफ बेजोस आणि मॅकेंजी बेजोसचा घटस्फोट- जेफ बेजोस हे ऍमेझॉनचे संस्थापक आहे. जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकेंजी बेजोसचा घटस्फोट खुप चर्चेचा विषय ठरला होता. या घटस्फोटानंतर मॅकेंजी अब्जाधिशांच्या यादीत सामील झाली होती. जेफ बेजोस यांनी घटस्फोटानंतर संपत्तीतून २ लाख ७० हजार कोटी रुपये मॅकेंजीला दिले होते. त्यामुळे ती जगातील २२ वी श्रीमंत व्यक्ती बनली होती.

२.बिल आणि सु ग्रासचा घटस्फोट- २०१७ मध्ये बिल आणि सु ग्रासचा घटस्फोट झाला होता. बिल यांनाही आपल्यासंपत्तीचा काही वाटा सु ग्रासला द्यावा लागला होता. त्यामुळे मिळालेल्या संपत्तीनंतर सु ग्रास ही अब्जाधिश लोकांच्या यादीत सामील झाली होती, तर बिलला जगातील ४०० श्रीमंत लोकांच्या यादीतून बाहेर झाले होते. घटस्फोटानंतर सु ग्रासला १.३ अरब डॉलरची संपत्ती मिळाली होती.

३. स्टिव आणि एलेन विनचा घटस्फोट- कसीनोचे प्रसिद्ध एलेन विनने २०१० मध्ये दुसऱ्यांदा घटस्फोट घेतला होता. त्यावेळी पत्नी एलेन विनला १.१ कोटी कंपनीचे शेअर्स मिळणार होते. त्याची किंमत ७९५ मिलियन डॉलर्स इतकी होती. त्यानंतर २०१८ मध्ये स्टिववर लैंगिक सोशषाचे आरोप लागले होते. तेव्हा त्याच्या पत्नीला २ अपब डॉलरची संपत्ती मिळाली होती.

४. हरोल्ड हॅम आणि सुई ऍनचा घटस्फोट- हरोल्ड हॅम यांना सुई ऍनशी घटस्फोट घ्यायचा होता. त्यामुळे त्यांना आपल्या संपत्तीतील काही भाग सुईला द्यावा लागला होता. त्यामध्ये त्यांना ९७.४ करोड डॉलर संपत्ती सुई ऍनला द्यावी लागली होती.

५.रॉय ई आणि पॅट्रेसिया डिज्नी यांचा घटस्फोट- रॉय आणि त्यांच्या पत्नीने २००७ साली घटस्फोट घेतला होता. तेव्हा रॉयचे वय ७७ वर्षांचे होते आणि पॅट्रेसिया डिज्नी ७२ वर्षांच्या होत्या. त्यांनी लग्नाच्या ५२ वर्षांनंतर घटस्फोट घेतला होता. तेव्हा रॉय यांच्याकडे १.३ अरब इतकी संपत्ती होती. या घटस्फोटामुळे त्यांना आपली आर्धी संपत्ती गमावली होती.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय
कॉमेडी क्विन भारती सिंहचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
निवडणुकीनंतर पंढरपूरात कोरोनाचा उद्रेक; ऑक्सिजनच्या तुटवड्याने रुग्ण अक्षरश तडफडताहेत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.