४५ गुन्हे दाखल, ४० वेळा जेल तरीपण चोरी करायच्या नवीन पद्धती शोधतो ‘कालिया’

चोरांच्या अनेक कहाण्या आणि किस्से तुम्ही ऐकले असतील. चोराला पकडल्यानंतर तो आवक5 खुलासे करतो आणि हे खूप धक्कादायक असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा चोराबद्दल सांगणार आहोत ज्याने आयुष्यभर चोऱ्याच केल्या आहेत.

हा शातीर चोर एका सेकंदात तुमचे पाकीट गायब करू शकतो. तो पोलिसांनाही घाबरत नाही आणि त्याला जेलमध्ये जाण्याचीही भीती वाटत नाही. या चोराचे नाव आहे कालिया ऊर्फ कालूराम पुत्र उत्तमारम आचार्य.

५० वर्षांच्या वयात त्याने २७ वर्षे फक्त चोऱ्याच केल्या आहेत. ३५ दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता आणि बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केली. ३० दिवसांत त्याने जवळपास एक डझनपेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत.

बाडमेर शहरात चोरांचे प्रमाण वाढत असताना पोलिसांनी पुन्हा त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. २२ वर्षांचा असताना त्याने एका घरात चोरी केली होती त्यानंतर चोऱ्या करण्यात तो पटाईत झाला.

त्यानंतर त्याने असंख्य चोऱ्या केल्या आहेत. त्याने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत. त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतर त्यांनी कबूल केले की त्यांनी जानेवारीमध्ये १२ पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत.

पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. त्यांच्याकडून १ बाईक आणि १८ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. हे सामान त्यांनी एका दुकानातून चोरले होते. मंदिर, दुकान, बंगले, मोबाईल चोरी, पॉकेटमारी अशा अनेक चोऱ्या त्यांनी आतापर्यंत केल्या आहेत.

पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर तो सगळे गुन्हे कबूल करतो. त्याचे लग्न झालेले नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर हा आरोपी पुन्हा चोऱ्या करतो. पोलीस पुन्हा पुन्हा त्याला पकडतात आणि काही दिवसांनी आरोपी पुन्हा सुटून जातो. त्याचे साथीदारही यामध्ये सामील आहेत.

महत्वाच्या बातम्या
दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केलेली १८ वर्षांची ग्रेटा आहे तरी कोण?
रिहानाचा आणि ख्रिस गेलचा ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ झाला व्हायरल, पहा व्हिडीओ
काकांनी केलेली जादू बघून तुमचेही डोळे चक्रावतील, पाहा ‘हा’ भन्नाट व्हिडीओ
मारिया माफ कर, तू बरोबर होतीस; ‘आता आम्हीही सचिनला ओळखत नाही’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.