फिलिपाईन्स | कोरोनाने पूर्ण जगात थैमान घातले आहे. आता कुठेतरी अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सगळे उद्योग ठप्प पडले होते त्यानंतर काही काळानंतर सगळे उद्योग हळूहळू सुरू करण्यात आले.
हॉटेल आणि रेस्टॉरंटसुद्धा सुरू करण्यात आले आहेत. पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी फक्त ऑनलाईन डिलिव्हरी हा पर्याय देण्यात आला आहे. ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर काही मिनिटांत गरमागरम जेवण घरी येतं पण फिलिपाईन्समध्ये एक विचित्र घटना घडली.
एका मुलीने ऑनलाईन जेवण ऑर्डर केले होते पण काही वेळाने तिच्या घरी चक्क ४२ डिलिव्हरी बॉय पोहोचले. हे पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले. काहींनीतर याचे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
कारण असा प्रकार याआधी कधीच घडला नव्हता. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरात चर्चा सुरू आहे. ४२ डिलिव्हरी बॉय दारासमोर पाहून मुलगी गोंधळात पडली. तिला काहीच सुचत नव्हते की हा प्रकार घडला कसकाय?
खरं तर डिलिव्हरी ऑर्डर केलेल्या अँपमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे ४२ डिलिव्हरी बॉईजला एकच ऑर्डर मिळाली होती. पण एवढी मोठी गर्दी पाहून मात्र लोक विचारात पडले होते. हा सर्व प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुकाराम मुंढेच नागपूरच्या विजयाचे खरे शिल्पकार! महापौर संदीप जोशींचा पराभव निश्चित
नंबर प्लेटबाबत RTO ची मोठी घोषणा, हाय सेक्युरिटी नंबरप्लेट नसेल तर…