4 वर्षांच्या मुलीनं मागवलं ‘इतक्या’ हजारांचं ऑनलाईन फूड, बिल बघून बापाने लावला डोक्याला हात

मुंबई। सध्या सगळ्या मुलांच्या हातात सतत मोबाईल असल्याचे पाहत असतो. अनेक मुलं तर मोबाईल हातात घेतल्याशिवाय जेवतही नाहीत. त्यांना सतत हातात मोबाईल लागतो. मात्र केव्हा केव्हा मुलं असच मोबाईलवर खेळत असताना चुकून काहीतरी क्लिक करतात व त्यामुळे अनेकवेळा काहीतरी चुकीच्या गोष्टी होत असतात.

अशीच एक घटना समोर आली आहे. एका ४ वर्षाच्या चिमुरडीने चक्क फूड पार्सल ऑर्डर केले, मात्र या पार्सलचे बिल पाहून तिच्या आई-वडिलांनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे.

जेव्हा फूड पार्सल आलं तेव्हा या ऑर्डरच्या बिल 15 हजार रुपये इतके झाले होते. ज्यावेळी मुलीच्या आईवडिलांनी हे पाहिले त्यावेळी त्यांना धक्का बसला आहे. नक्की केलं काय या चिमुरडीने पाहुयात.

हा व्हिडीओ फॅंग नावाच्या व्हिडीओ चॅनेलने आपल्या पेजवरुन शेअर केला आहे. ही घटना चीनमधील आहे. या व्हिडीओ दिसणाऱ्या 4 वर्षांच्या मुलीला खूप भूक लागली म्हणून तिने वडिलांच्या मोबाईल फोनवरुन ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऑर्डर केली.

तिने सोयाबीन पेस्टसह नुडल्स ऑर्डर केले. मात्र या लहान मुलीकडून ऑर्डर करताना एक चूक झाली. तिने एक नूडल्स (Noodles) मोबाईल टाईप करताना चुकून त्यापुढे 2 शून्य अधिक टाईप केले. त्यामुळे संबंधित फूड कंपनीकडे एक नूडल्स बाऊल ऐवजी 100 नूडल्स बाऊल ऑर्डर नोंद झाली.

ही ऑर्डर पाहताच संबंधित कंपनीला वाटले की कदाचित पार्टी ऑर्डर असावी. परंतु, कंपनीचा डिलिव्हरी बॉय जेव्हा ही ऑर्डर घेऊन संबंधित मुलीच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या पालकांनी ऑर्डर पाहून डोक्यावर हात मारुन घेतला.

कारण हा डिलिव्हरी बॉय एका नूडल्स बाऊल ऐवजी 100 नूडल्स बाऊल घेऊन आला होता. या कुटुंबाचे संपूर्ण घर या बाऊल्सने भरुन गेले. या ऑर्डरच्या बिलापोटी जेव्हा 15 हजार रुपये देण्याची वेळ आली तेव्हा या मुलीच्या वडिलांना धक्का बसला.

मात्र त्यानंतर एवढ्या फूडचे काय करावे हे मुलीच्या पालकांना समजत नव्हतं, शेवटी या कुटुंबाने 8 नुडल्स बाऊल स्वतःसाठी ठेवत बाकीचे नूडल्स बाऊल गरजू कर्मचाऱ्यांना वाटप केले. या कुटुंबाच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या
६ लाखात येणार भारतातील सगळ्यात सुरक्षित कार, global NCAP कडून मिळाले आहे ५ स्टार रेटींग
मोठी बातमी! राखी सावंतकडून झाली मोठी चुक, बोलता बोलता सांगितले खतरों के खिलाडीच्या विजेत्याचे नाव
लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती पत्नी, समोर आला धक्कादायक प्रकार
करोडोंच्या संपत्तीचा मालक असला तरी वडील सलीन खानचे एक स्वप्न अजूनही पुर्ण शकला नाही सलमान खान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.