सध्याच्या काळात अनेक लोकांना हृदयाच्या संबंधित आजार झाल्याचे पाहायला मिळतात. हृदयाशी(Heart) संबंधित समस्या सध्याच्या काळात सामान्य झाल्या आहेत. तरुण वर्गाला हृदयाशी संबंधित असलेल्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आजकाल तरुणांना हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, हृदयक्रिया बंद पडणे आदी समस्या होत आहेत. (4 year old boy had heart attack! )
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील मिशिगनमधून एक घटना समोर आली होती. अमेरिकेतील मिशिगनमध्ये काही वर्षांपूर्वी एका मुलाचा जन्म झाला होता. त्या मॅक्स विगेल असे होते. मॅक्सला हृदयाशी संबंधित दोन समस्या होत्या. मॅक्सला जन्मापासून अॅट्रियल सेप्टल डिफेक्ट (एएसडी) हा आजार झाला होता.
अॅट्रियल सेप्टल डिफेक्ट या आजारामध्ये व्यक्तीला हृदयाच्या वरच्या भागात एक छिद्र असते. मॅक्सला हृदयाशी संबंधित आणखी एक आजार होता. त्याचे हृदयाचे डावे वेंट्रिक्युलर निकामी झाले होते. या आजाराला ‘लेफ्ट वेंट्रिक्युलर नॉन-कॉम्पॅक्शन कार्डिओमायोपॅथी’ असे म्हणतात. २०१९ मध्ये त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली. यावेळी मॅक्सचे वय चार वर्षे होते.
शस्त्रक्रियेनंतर मॅक्सला घरी नेण्यात आले. पण मॅक्सला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला पुहा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी मॅक्सला पक्षाघाताचा झटका आल्याचे सांगितले. पक्षाघाताच्या झटक्यामुळे मॅक्सच्या अर्ध्या शरीराने काम करणे बंद केले होते. पण आता मॅक्स सामान्य जीवन जगत आहे. ही सर्व परिस्थिती अॅट्रियल सेप्टल दोष (ASD) मुळे झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार मुलांना जन्मजात उदभवण्याची शक्यता असते. या आजाराचे लवकर निदान झाल्यास योग्य उपचार होऊ शकतात. अॅट्रियल सेप्टल दोष (ASD) म्हणजे काय? त्याची लक्षणे काय आहेत? तसेच मुलांमध्ये काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना कधी भेटावे, यासंदर्भातील माहिती आपण जाणून घेऊयात.
मानवी हृदयाला चार कप्पे असतात. हे कप्पे एकमेकांशी जोडलेले असतात. एट्रियल सेप्टल डिफेक्ट्स या आजारामध्ये हृदयाच्या वरच्या कप्प्यात छिद्र असते. या छिद्रामुळे दोन्ही कप्प्यांमध्ये असलेले रक्त एकमेकांमध्ये मिसळू लागते. एट्रियल सेप्टल डिफेक्ट्स हा आजार दुर्मिळ आहे. ही छिद्रे वयानुसार बंद होतात. पण छिद्रे मोठे असल्यास हृदय आणि फुफ्फुसाचे मोठे नुकसान होते.
यासाठी हृदय शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. ऍट्रियल सेप्टल दोषांचे काही प्रकार आहेत. Secundum हा एट्रियल सेप्टल डिफेक्ट्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे. यामध्ये हृदयाच्या वरच्या कप्प्यात छिद्र असते. प्रिमम हा प्रकार हृदयाच्या खालच्या कप्य्यात परिणाम करतो. सायनस व्हेनोसस हा एक दुर्मिळ प्रकारचा एट्रियल सेप्टल डिफेक्ट्स आहे. हा प्रकार हृदयाच्या वरच्या कप्प्यात होतो.
महत्वाच्या बातम्या :-
शरद पवारांनी दटावताच संजय राऊतांची पलटी; ज्या आमदाराला गद्दार म्हटले त्याचेच केले कौतूक
गौतम गंभीरकडून नुपुर शर्माचे जाहीर समर्थन; धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवाद्यांवर साधला निशाणा
प्रयागराज हिंसाचाराच्या मास्टरमाईंडच्या घरावर योगींचा बुलडोझर; घरात सापडली घातक शस्रे