मंदिराजवळ मांस फेकणाऱ्या दोन महिलांना आणि दोन पुरुषांना अटक; पोलीसांनी केला हैराण करणारा खुलासा

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरच्या जौला गावातील एका मंदिराजवळ विचित्र घटना घडली होती. चार लोकांनी मंदिराजवळ मांसाचे तुकडे फेकले आहे. आता मांसाचे तुकडे फेकल्याप्रकरणी पोलिसांकडून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या प्रकरणी स्थानिक तरुण राकेश, त्याची पत्नी कुसुम, भाऊ राजेश आणि त्याची पत्नी अनारकली यांना अटक करण्यात आली आहे. शहरातील बुढाणा पोलिसांनी ही कारवाई केली. येथे एसएचओ संजीव कुमार यांनी सांगितले की, या लोकांविरुद्ध आयपीसीच्या कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक स्थळाचा अपमान करण्यासाठी, कोणतेही आक्षेपार्ह काम करण्यासाठी हा कलम लागू जातो.

सोमवार, 6 सप्टेंबर रोजी जौला गावात खूप तणाव होता. येथील मंदिराजवळ काही मांसाचे तुकडे पडलेले आढळल्याने लोक, विशेषत: हिंदू समाजातील लोक संतापले होते. घटनेची माहिती मिळताच मंदिराबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते.

मंदिराजवळ मांसाचे तुकडे फेकल्यामुळे हा धार्मिक श्रद्धेचा विषय बनला होता, त्यामुळे त्या मंदिराजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला लोकांना संशय आला की हे दुसर्‍या समाजातील व्यक्तीचे कृत्य असू शकते. या घटनेमुळे काही नागरीक तिथे गोंधळ घालत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तिथून काढून टाकले.

संदीप सैनी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या बाहेर मांसाचे तुकडे ठेवणाऱ्यांना शोधण्यासाठी ३ जणांची टीम तयार करण्यात आली होती. उपनिरीक्षक अनिल कुमार, हेड कॉन्स्टेबल विकास कुमार आणि कॉन्स्टेबल इरफान. दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ तारखेच्या दुपारपर्यंत या प्रकरणातील ४ आरोपींची ओळख झाली,

हे चारही आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. आरोपींची ओळख झाल्यानंतर आणि त्यांना अटक केल्यानंतर तिथले सर्व नागरीक शांत झाले आहे. या प्रकरणाबाबत मुजफ्फर पोलीसांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

या चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दंड वसल करण्यात आले आहे. मात्र, त्यांनी मंदिराजवळ मांस का फेकले किंवा ठेवले होते हे अद्याप समजू शकलेले नाही. पण या घटनेमुळे संपुर्ण परीसरात एकच गोंधळ उडाला होता.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय वंशाच्या जसकरणाने ठोकले सहा बॉलात सहा सिक्स अन् रचला इतिहास; व्हिडिओ होतोय व्हायरल
कधी विचार केला आहे का, माशी एकाच जागी बसून आपले हात एकमेकांना का घासत असते? वाचून अवाक व्हाल
भारतीय संघाचा मेंटॉर बनताच धोनीला काढण्यासाठी षड्यंत्र सुरु; बीसीसीआयकडे तक्रार दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.