कोलकत्याहून मध्यप्रदेश मधील एका हॉटेल थांबलेले होते. तेथील हॉटेल मध्ये वास्तव्याला आसलेले जोडप्याला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. हा प्रसंग इंदूरमधील एका हॉटेल मध्ये घडला आहे.
हॉटेलमध्ये राहत असलेले हे जोडपे, जेव्हा पती काही कामानिमित्त खाली गेला असता पत्नी रूममध्ये तयार होत होती. तयारी करत असतांना त्या महिलेला तीन तरुण पडद्यामागून आत डोकावून बघत असल्याचे लक्षात आले. हे तिघेही तरुण हाऊस कीपिंग स्टाफमधील होते.
सोलारिस असे त्या हॉटेल चे नाव असून ते इंदूरच्या भवर कुआ पोलीस ठाण्याच्या सीमेत आहे. रूममध्ये त्या तिघांनाही पडद्याआडून डोकावतांना बघून धक्काच बसला आहे. घडलेला हा सगळा प्रकार सिसिटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यासंबंधीत महिलेने तक्रार केली आहे. तक्रारीनंतर तपासात सिव्हिटीव्हीत ते तिघेही रुममध्ये डोकावतांना दिसत आहेत.
भवरकुआ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलीस यासंबंधीत पुढील तपास करीत आहेत.
यासारखाच अजून एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये नोएडातील एका हॉटेलमध्ये झाला होता. त्या हॉटेल मध्येही कॅमेरे बसवण्यात आलेले होते. व्हिडिओ बनवून त्याआधारावर लोकांना धमकावले जात होते. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली. या आरोपींनी कॅमेरा रूममध्ये आधीच लपवून ठेवला होता. नंतर हा कॅमेरा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा दिसला नव्हता.
रूममध्ये यासारखे कॅमेरे लावण्यासाठी रूम डेकॉरचा आधार घेतला जातो. स्पीकर्स,किंवा सजावटीच्या वस्तू त्यात कॅमेरे लपवून ठेवले जाऊ शकता म्हणून त्यांचा वापर केला जातो. बऱ्याचदा बाथरूम मध्येही कॅमेरे लपवलेले असू शकता. त्यामुळे अशा कोणत्याही ठिकाणी गेल्यावर अशी या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे. जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या
Kolhapur : कोल्हापूरात काही तरुणांनी मिळून केली हॉटेलची तोडफोड, कारण ऐकून हादरुन जाल
हॉटेलचे ३७ वर्षे जुने बिल व्हायरल; शाही पनीर अन् दाल मखनीची किंमत वाचून हैराण व्हाल
उंचीवर बसून अश्लील व्हिडीओ बनवत होते कपल, दूरवर बसलेल्या व्यक्तीने दुर्बिणीतून पाहिलं अन्…