३८ वर्षीय मिताली राज ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारवर झाली फिदा; म्हणाली, मला तो खुप आवडतो

मिताली राज सध्या वनडे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. ती २२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाशी जोडलेली आहे. अलीकडेच तिने टीव्ही शोमध्ये आपली लग्नाची निवड सांगितली आहे. काही काळापूर्वी मिताली राज ‘कपिल शर्मा शो’मध्ये दिसली होती. त्यांच्या सहकारी क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि झुलन गोस्वामी हेही पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जेव्हा कपिल शर्माने मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि झुलन गोस्वामी यांना विचारले की तुला क्रिकेटर सोबत लग्न करायचे आहे की बॉलीवूडच्या कोणत्याही कलाकाराशी लग्न करायचं आहे. कपिल शर्माच्या प्रश्नाला मिताली राजने दिलखुलास उत्तर दिलं, ती म्हणाली, बॉलिवूडशी संबंधित कोणाशीही लग्न करायला माझी हरकत नाही, जो आवडला त्याचं लग्न झालं, मला तर आमीर खान आवडतो.

हरमनप्रीत कौर गमतीने म्हणाली, ‘मला रणवीर सिंग आवडतो, पण तो तुझ्यावली पत्नीसोबत सेट आहे. खरंतर कपिल शर्माने अनेकवेळा सांगितले आहे कि, दीपिका पदुकोण त्याला  आवडते, त्यामुळे हरमनप्रीतने तसे म्हटले आहे. वेदा कृष्णमूर्ती एकदम मस्तीच्या मूडमध्ये दिसली, ती म्हणाली, ‘तुला दीपिका आवडते, मला रणवीर आवडतो, आम्ही दोघे सेटिंग करतो’. तर दुसरीकडे झुलन गोस्वामीने सांगितले की, मला शाहरुख खान आवडतो.

भारताची स्टार फलंदाज मिताली राजने आपल्या खेळाने स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले आहे. पण खेळ हे तिचे पहिले प्रेम नव्हते. वडिलांच्या सांगण्यावरून मिताली राज क्रिकेटर बनली. तिला नृत्याची आवड होती. तिला लहानपणापासूनच नृत्यांगना व्हायचं होतं. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले आहे. मितालीचा भाऊ आणि वडीलही माजी क्रिकेटपटू राहिले आहेत.

३ डिसेंबर १९८२ रोजी जोधपूर, राजस्थान येथे जन्मलेल्या मिताली राजने अद्याप लग्न केलेले नाही. इतकं वय असूनही लग्न न होण्याचं कारणही खूप खास आहे. मिताली म्हणाली, ‘खूप पूर्वी मी लहान असताना हा विचार माझ्या मनात यायचा, पण आता जेव्हा मी विवाहित लोकांना पाहते तेव्हा माझ्या मनात हा विचार येत नाही. मी अविवाहित असल्याचा खूप आनंद आहे.

मिताली राजने १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. वनडे क्रिकेटमध्ये ७००० हून अधिक धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर ७ शतके आहेत. यासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये २३६४ धावा केल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.