३८ पत्नी विधवा, तर ८९ मुले पोरकी, जगातील सर्वात मोठ्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर, जाणून घ्या..

नवी दिल्ली । देशात कोरोनामुळे हाहाकार सुरू आहे. कोरोनामुळे अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहे. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक लोकांनी आपल्या जवळची मानस गमावली आहे. यामुळे अनेक कुटूंब उध्वस्त झाली आहेत.

जगातील सर्वात मोठे कुटूंब म्हणून ओळखले जाणारे चाना परिवारावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचे प्रमुख असणारे जिओना चाना यांचे निधन झाले आहे. यामुळे त्यांच्या ३८ पत्नी विधवा झाल्या असून त्यांची ८९ मुले पोरकी झाली आहेत. मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

संबंधित कुटुंब हे मिझोराम येथील रहिवासी असून त्यांचे गाव त्यांच्या कुटुंबामुळे प्रसिद्ध आहे. एवढेच नाही तर त्यांच्या गावात पर्यटक विशेष त्यांच्यामुळे गावात जातात. जिओना यांच्या कुटुंबातील महिला शेती करुन घरात हातभार लावतात. यामध्ये जिओना यांची पहिली पत्नी प्रमुख भूमिका साकारते जिओना यांच्या पहिल्या पत्नीने इतर सर्व पत्नींना काम वाटून दिले असून ती त्यांच्यावर लक्ष ठेवते.

जिओना यांना १४ सूना आणि ३३ नातवंड आहे. एकूण १८१ लोकांचे असलेले हे कुटुंब १०० खोल्यांच्या घरात राहते. हे कुटुंब घराच्या अंगणात, आजूबाजूला शेतात पालक, कोबी, मोहरी, मिरची, ब्रोकोली इत्यादी भाजीपाला पिकवतात. घरातील बागेमुळे या कुटुंबाच्या पैशाची बचत होते.

दरम्यान, जिओना चाना हे १९९४ मध्ये सुरू झालेल्या ख्रिश्चन ग्रुप चानाचे प्रमुख होते. त्यांच्यामध्ये एकापेक्षा अनेक लग्न करण्यास परवानगी आहे. या समाजात आत्तापर्यंत ४०० कुटुंबांची नोंद आहे. यांचा मुख्य उद्देश आहे की, जास्तीत-जास्त मुले जन्माला घालून समाज मोठा करणे. मात्र, कोरोनामुळे या कुटुंबावरही भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

ताज्या बातम्या

भिकारी बनणे संजीव कुमारला पडले महागात; दिग्दर्शकाने न ओळखताच सेटवरुन पळवून लावले

कोरोनाची लस घेणाऱ्यांसाठी खास ऑफर; देत आहेत, कार, सोने आणि आयफोन

‘अग्गबाई सुनबाई’मध्ये नवीन वळण; आसावरीला कळणार सोहम आणि सुझॅनच्या नात्याविषयी?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.