पुण्यात तब्बल ३२ हजार परप्रांतीय मजूर, नागरिक दाखल

 

पुणे | राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये रोजगार मिळत नसल्याने अनेक परप्रांतीय मजूर, नागरिक आपल्या गावी परत निघून गेले होते.

आता राज्यात लॉकडाऊनची अनेक बंधने शिथिल करण्यात येत आहे. यामुळे आता पुन्हा परप्रांतीय मजूर राज्यात येण्यास सुरुवात झाली आहे.

एका महिन्यात पुण्यात तब्बल ३२ हजार २७३ परप्रांतीय मजूर आणि नागरिक पुण्यात दाखल झाले आहेत.

१ जून ते ३० जून या काळात हे सर्व परप्रांतीय पुण्यात दाखल झाले आहेत. हे सर्व नागरिक, मजूर बिहार, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, ओरिसा, आणि दिल्ली या राज्यातून आलेले आहे.

दरम्यान, कोरोना संकटामुळे पुणे रेल्वे स्थानकावर परप्रांतीय प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यासाठी २४ तास रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथक तैनात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.