३१ ते ४० वयोगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक; जाणून घ्या यामागचे कारण

मुंबई |  राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. माञ ३१ ते ४० वयोगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. राज्यात या वयोगटातील नागरिकांना कोरोनाची बाधा जास्त प्रमाणात होतं असल्याचे आढळून आले आहे.

याबाबत राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने रविवारी अहवाल सादर केला आहे. हा सदर अहवाल १५ लाख ७८ हजार ३३२ रूग्णांचा आकडा धरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामधुन ही माहिती समोर आली आहे.

या अहवालानुसार राज्यात सर्वाधिक जास्त रूग्ण ३१ ते ४० या वयोगटातील असून ३ लाख ३५ हजार ७६५ इतकी आहे. यामुळे जे नागरिक ३१ ते ४० वयोगटातील असतील त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना राज्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणतात की, ‘३१ ते ४० या वयोगटातील नागरिकांचे कोरोना बाधित होण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे,  ‘या वयोगातील जास्त लोक नोकरी, कामा-धंद्यासाठी बाहेर पडत आहे. त्यांचा सामाजिक वावर जास्त अनेक लोकांच्या संपर्कात ते येत असावेत.’

वाचा वयोगटानुसार रूग्णांची आकडेवारी…२१ ते ३० वयोगटातील रुग्ण संख्या २ लाख ६६ हजार ४७० इतकी आहे.  तर ५१ ते ६० वयोगटातील रुग्णसंख्या २ लाख ५२ हजार ४९२ इतकी आहे. ६१ ते ७१ वयोगटातील रुग्णसंख्या १ लाख ६९ हजार ८६० इतकी आहे. त्याचप्रमाणे ११ ते २० वयोगटातील रुग्णसंख्या १ लाख ०७ हजार ७११ इतकी आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
काळजी घ्या! हिवाळ्यामध्ये कोरोना साथीची दुसरी लाट येणार; तज्ञांचा दावा
एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले
म्हणून शक्तीमान मुकेश खन्नांनी अजूनही नाही केले लग्न! सांगीतले धक्कादायक कारण
फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.