‘या’ वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा धोका जास्त; धक्कादायक अहवाल आला समोर

मुंबई | देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. माञ ३१ ते ४० वयोगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. राज्यात या वयोगटातील नागरिकांना कोरोनाची बाधा जास्त प्रमाणात होतं असल्याचे आढळून आले आहे.

याबाबत राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने रविवारी अहवाल सादर केला आहे. हा सदर अहवाल १५ लाख ७८ हजार ३३२ रूग्णांचा आकडा धरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामधुन ही माहिती समोर आली आहे.

या अहवालानुसार राज्यात सर्वाधिक जास्त रूग्ण ३१ ते ४० या वयोगटातील असून ३ लाख ३५ हजार ७६५ इतकी आहे. यामुळे जे नागरिक ३१ ते ४० वयोगटातील असतील त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना राज्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणतात की, ‘३१ ते ४० या वयोगटातील नागरिकांचे कोरोना बाधित होण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे, ‘या वयोगातील जास्त लोक नोकरी, कामा-धंद्यासाठी बाहेर पडत आहे. त्यांचा सामाजिक वावर जास्त अनेक लोकांच्या संपर्कात ते येत असावेत.’

वाचा वयोगटानुसार रूग्णांची आकडेवारी…
२१ ते ३० वयोगटातील रुग्ण संख्या २ लाख ६६ हजार ४७० इतकी आहे. तर ५१ ते ६० वयोगटातील रुग्णसंख्या २ लाख ५२ हजार ४९२ इतकी आहे. ६१ ते ७१ वयोगटातील रुग्णसंख्या १ लाख ६९ हजार ८६० इतकी आहे. त्याचप्रमाणे ११ ते २० वयोगटातील रुग्णसंख्या १ लाख ०७ हजार ७११ इतकी आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
फेब्रुवारीपासून कोरोनाची साथ उतरणीस लागणार; केंद्राच्या समितीचा अंदाज
पाटलांना राष्ट्रवादीमध्ये आता एन्ट्री नाही, दिल्या घरी सुखी रहा; शरद पवारांचा टोला
रस्ता वाहून गेला तरीही फडणवीस बांधावरुन चिखल तुडवत शेतकऱ्याच्या भेटीला..
मुख्यमंत्री गावातच आले नाही तर नुकसान दिसणार कसे; पुलावर बोलावल्याने ग्रामस्थ संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.