पिवळं सोनं! हळदीला विक्रमी भाव, प्रतिक्विंटल शेतकऱ्यांना ३० हजार रुपये

सागंली | सध्या सांगली बाजार समितीत हळदीला उच्चांकी दर मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात हळदीला प्रथमच रेकॉर्डब्रेक ३० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीला चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे.

हळदीच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. याशिवाय राज्यात अवेळी झालेल्या पावसामुळे हळदीचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटले आहे. तसेच मागणी वाढल्याने हळदीचे भाव अचानक वाढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यातीसाठी हळदीची मागणी वाढली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या हळदीच्या पिकाला सोन्यासारखा भाव मिळत असल्याच्या भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. जागतिक हळदीची बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये देशातल्या अनेक राज्यातून हळद विक्रीसाठी आणली जाते. त्याचबरोबर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे पिक घेतले जाते.

बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या सौद्यात हळदीला उच्चांकी दर मिळाला आहे. यामध्ये बिपिन खोत या शेतकऱ्यांच्या राजापुरी हळदीला तब्बल ३१ हजार रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच  बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या हळदीला ३० हजार क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
आठवड्याभरातच दीड हजार रुपयांनी सोनं स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा भाव
खुशखबर! शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा
VIDEO: ‘सोपं असतं तर प्रत्येकजण शेतकरी असता’, आनंद महिंद्रांचा महिला ‘शक्ती’ला अनोखा सलाम
जुन्या साडीचं केलं भन्नाट जुगाड, ‘या’ जुगाडूची कला पाहून भलेभले झाले थक्क; पहा व्हिडीओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.