विमानतळावर ‘त्या’ बॅगमध्ये सापडले तब्बल ३० किलो सोने; आरोपीचा संबंध थेट मुख्यमंत्र्यांशी

 

तिरुअनंतपूरम। कोरोनेविरुद्ध लढाई सुरू असतानाच केरळमध्ये आणखी एका प्रकरणाने प्रचंड वादळ निर्माण झाले आहे. केरळ सरकारच्या विदेशात कार्यरत असलेल्या माजी जनसंपर्क अधिकाऱ्याच्या बॅगेत तब्बल ३० किलो सोने कस्टम्स विभागाच्या तपासणीत आढळून आले होते.

त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्या अधिकाऱ्याचा संबंध थेट केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी असल्याने विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर आरोप केले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत १५ कोटी रुपये एवढी होते. केरळ सरकारच्या माजी जनसंपर्क अधिकारी सरित कुमार यांच्या बॅगेत हे सोने आढळले आहे. सरिता कुमार या UAEमध्ये कार्यरत होत्या.

इथल्या विमानतळावर या प्रकरणाशी संबंधीत असल्याच्या आरोपावरून सरिता यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. त्यांना १४ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. याच प्रकरणाशी संबंधीत स्वप्ना सुरेश या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

स्वप्ना यांनी ही बॅग आपलीच असल्याचा दावा केला होता. सरिता कुमार यांचा संबंध मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधीत एका IAS अधिकाऱ्यांशी असल्याचा आरोप झाला आहे. तर मुख्यमंत्री विजयन हे आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आरोप झाले आहेत.

या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित IAS अधिकाऱ्यांची तकाफडकी बदली केली आहे. “कुठल्याही भ्रष्ट माणसाला वाचविण्याचा आपण प्रयत्न करत नाही आणि या प्रकरणाशी काहीही संबंध नाही”, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिले आहे.

या प्रकरणामुळे केरळच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. तसेच अनेक आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत. आता हे सोने भारतात आले कसे आणि ते कुठे जाणार होते याचा शोध अधिकारी घेत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.