माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) नेहमी त्यांच्या ट्विटमुळे किंवा वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस मुंबईच्या ट्रॅफिकबाबत वक्तव्य करून चर्चेत आल्या आहेत. मुंबईत(Mumbai) ३% घटस्फोट ट्रॅफिक जाममुळे होत आहेत, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे.(3% divorce due to traffic congestion in Mumbai claim by Amrita Fadnavis)
मुंबईतील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी हा दावा केला आहे. हा दावा करत असताना अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. मुंबईच्या मेट्रो मेस नावाच्या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आहे, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
अमृता फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, मुंबईच्या वाटेवर खड्डे पडले आहेत. कार, मोटार सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणारी व्यक्ती बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते. त्यामुळे ती व्यक्ती आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. मुंबईतील सर्व घटस्फोटांपैकी ३% घटस्फोट मुंबईच्या ट्रॅफिकमुळे होत आहेत, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.
अमृता फडणवीस यापुढे म्हणाल्या की, “मी जेव्हा एका सामान्य महिलेप्रमाणे सकाळी घराबाहेर पडते, तेव्हा मलाही ट्रॅफिकचा सामना करावा लागतो.” मुंबईमध्ये भाजप पक्षाकडून कॅन्सरमुक्त अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचा शुभारंभ आज अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाला. हा कार्यक्रम झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला.
यावेळी अमृता फडणवीस यांनी मुंबईमधील ट्रॅफिक बाबतच्या विषयावर भाष्य केले. पत्रकारांशी सवांद साधताना अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. “महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त वसुली सरकार आहे. जनतेला किती समस्यांना सामोरं जावं लागत आहे याची काहीच सरकारला पडलेली नाही, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर चांगलाच समाचार घेतला आहे. “वाहतूक कोंडीमुळे ३% घटस्फोट होतात हा जावईशोध कुठून लावला ते शोधलं पाहिजे. दरवेळी हे जावईशोध लावून आघाडी सरकारवर बोललं जातंय. ज्या प्रकारे महाराष्ट्रात बदल झालंय त्यामुळे भाजपाचे पुरुष खूप हैराण आहेत. त्यांच्या घरातील महिलांना इतका त्रास व्हायला लागला का?”, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
काळीज फाटलं! जन्मदात्या आईवर आली बाळाला विकण्याची वेळ आली; घटना वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पानी
“वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले असून,कितीही दडवले तरी बोलण्यातून त्यांची चड्डी दिसतेच.”
जगातील सर्वात श्रीमंत देश कोरोनामुळे कर्जाच्या ओझ्याखाली, कर्जाचा आकडा वाचून डोळे फिरतील