….म्हणून २९ वर्षाच्या तरूणीने केले ८० वर्षाच्या वृध्दासोबत लग्न; कारण वाचून वाटेल कौतुक

खरं प्रेम कधी विसरता येत नाही व प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि ते कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आला आहे. एका २९ वर्षीय पत्रकार तरुणीने ८० वर्षाच्या वृध्दासोबत लग्न केले आहे. या विवाहात वृध्दाची ५६ वर्षाची मुलगी साक्षीदार बनली आहे.

विल्सन आणि तेरजल असं त्या जोडप्याच नाव आहे. २०१६ मध्ये एका कार्यक्रमात दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ४ वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यावर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रेमामुळे विल्सन यांना वृध्दपकाळात काळजी घेणारी पत्नी तर तेरजेल यांना एक चांगला पती मिळाल्याचा अनूभव आला आहे. दोघांच्याही कुटूंबांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली आहे.

याबाबत बोलताना तेरजलनी सागितलं की एका कार्यक्रमात मी पत्रकार म्हूणन गेले होते. तिथं माझी विल्सनची ओळख झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो याकाळात विल्सन यांनी माझी खूप मदत केली आहे. माझ्या शिक्षणात आणि वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आर्थिक मदत केली आहे. आम्ही दोघेही एकमेकांसोबत सर्व गोष्टी शेअर करतो.

तर विल्सन म्हणाले की माझ्या पत्नीचं निधन झालं आहे आणि माझं ते पहिलं प्रेम होतं. माझ्या पत्नीचा २००२ मध्ये मृत्यू झाला आहे. त्यानंतर तेरजल मला भेटली आणि ती माझी खूप काळजी घेते. आमचं नातं इतक्या दिवस टीकेल असं आम्हाला वाटलंही नव्हतं. त्यामुळे मी तिच्याशी लग्न करायच ठरवलं आहे. अगदी आनंदात मी आणि तेरजल एकत्र राहत आहोत.
म्हत्वाच्या बातम्या-
४२ वर्षांची असूनही अविवाहीत आहे शिल्पा शेट्टीची बहीण शमिता; ‘ह्या’ एका चुकीमूळे करिअर झाले होते खराब
‘स्टाइल’ चित्रपटातील अभिनेत्री आठवते का? फोटो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
हो हे खरं आहे! फक्त ५१ रूपयात करा थाटामाटात विवाह

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.