Share

२७ वर्षीय पोलीस शिपायाचा व्यायाम करताना मृत्यु, चालता चालता छातीत कळ आली अन्…

police constable.

महाराष्ट्रातील ठाणे(Thane) शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुण पोलीस(Police) शिपायाचा मैदानावर व्यायाम करत असताना मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली आहे. महेश मोरे असं मृत्यू झालेल्या पोलीस शिपायाचे नाव असून तो अवघ्या २७ वर्षांचा होता. या घटनेमुळे ठाणे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.(27 year age police constable death while exercising)

ठाणे पोलीसांच्या शीघ्र कृती दलात महेश मोरे पोलीस शिपाई म्ह्णून कार्यरत होते. दररोज सकाळी शीघ्र कृती दलातील पोलीस कर्मचारी सकाळी ६ वाजता ठाण्यातील साकेत मैदानावर(Ground) व्यायामासाठी जात असतात. त्यांच्याबरोबर महेश मोरे हे देखील व्यायाम करण्यासाठी जायचे. गुरुवारी सकाळी व्यायाम करत असताना महेश मोरे अचानक जमिनीवर कोसळले.

मैदानावर उपस्थित असणाऱ्या लोकांनी महेश मोरे यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस शिपाई महेश मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर महेश मोरे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? याचा उलगडा होईल, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

पोलीस शिपाई महेश मोरे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. महेश मोरे इंदापूर सारख्या छोट्या गावामधून महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्यासाठी ठाणे शहरात आले होते. पण गुरुवारी सकाळी पोलीस शिपाई महेश मोरे यांचा आकस्मित मृत्यू झाला आहे .
पोलीस शिपाई महेश मोरे यांच्यामागे त्यांची पत्नी आणि एक दोन वर्षांचा मुलगा आहे. महेश मोरे यांची पत्नीही ठाणे वाहतूक विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहे. महेश मोरे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस शिपाई यांच्या आकस्मित मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी औरंगाबाद येथील कायगाव टोका गावात बंदोबस्ताला असताना पोलीस शिपाई श्याम पाडगावकर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. कामाच्या दगदगीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. व्यायाम करत असताना पोलिसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
बंडातात्या किर्तनकार आहे की नाही हाच प्रश्न; सुप्रियाताईंना दारूडी म्हटल्यामुळे राष्ट्रवादी संतापली
अजित पवारांनी पुरवला चोपदाराच्या लेकीचा हट्ट; वाचा नेमकं काय घडलं…
“उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now