शेवटी पोटाचा प्रश्न! शिपाई पदाच्या १३ जागांसाठी २७ हजार अर्ज, वाचा बेरोजगारीची भीषणता

हरियाणा |  देशावर कित्येक वर्षांपासून  बेरोजगारीचे संकट ओढवलेले आहे. सरकार बेरोजगारांना रोजगार देण्याच्या घोषणा करतं पण प्रत्यक्षात मात्र असं काही होत नाही. हरियाणा राज्यातील पानीपतमध्ये बेरोजगारीचा प्रश्न किती भीषण होत चाललेला आहे याची भीषणता दाखणारी घटना घडली आहे.

पानीपतमधील न्यायालयातील गट क वर्गातील १३ शिपाई पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी पात्रता फक्त आठवी पास ठेवण्यात आली होती. मात्र १३ जागांसाठी चक्क २७ हजार ६७१ उमेदवारांनी अर्ज केले होते. हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा, बीटेक अशा पदवीचे शिक्षण घेतलेल्या तरूण तरूणींनी अर्ज केले होते. भरतीच्या दिवशी सर्व उच्च शिक्षित तरूणतरुणी न्यायालयाच्या मैदानावर उपस्थित होते.

उच्च शिक्षण घेऊनही चांगली नोकरी मिळत नसल्याने शिपाई का होईना पण नोकरी मिळवून आपल्या परिवाराचा सांभाळ करता यावा. या हेतूने तरूण तरूणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता २७ हजारांपेक्षा जास्त उमेदवारातून कोणाची निवड करण्यात येते. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सध्या कोरोनाची महामारी देशात पसरली आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे रोजगारीचा प्रश्न फक्त हरियाणामध्येच नाहीतर संपुर्ण देशातील नागरिकांना उद्भवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
त्याने सात तास झोपा काढून कमवले तब्बल ११ लाख रुपये, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
वाऱ्याची झुळूक आली आणि मी बाळंतीण झाले, महिलेच्या दाव्याने डॉक्टरही चक्रावले
मानलं भावा! कॉल सेंटरवर काम करणारा नितीन ‘असा’ झाला ११ हजार कोटींचा मालक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.