जळगावात राजकीय भूकंप! भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेत; भाजपाचा करेक्ट कार्यक्रम होणार?

मुंबई : महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीला चार दिवस शिल्लक असतानाच जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. सत्ताधारी भाजपचे ५७ पैकी तब्बल २७ हून अधिक नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले असून रविवारी सायंकाळीच सहलीला रवानाही झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, भाजपकडून व्हीप जारी करण्यापूर्वीच हे नगरसेवक सहलीवर गेले आहेत. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला आहे. याचबरोबर महापौरपदासाठी सेनेच्या जयश्री महाजन यांचं नावही निश्चित केले आहे.

जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्चला संपणार आहे. १८ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भाजपमधून महापौरपदासाठी उमेदवाराची निवड रविवारी होणार होती.

मात्र, त्याआधीच काही सदस्य गायब झाल्याची चर्चा सायंकाळी सुरू झाली. त्यामुळे ही बैठकही बारगळली. आता अशा स्थितीत शिवसेनेकडून महापालिकेवर भगवा फडकवला जाण्याची शक्यता शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

झोपडीत राहणाऱ्या मुलाचा डान्स पाहून माधुरीही झाली होती फिदा; झळकला डान्स दिवानेमध्ये, व्हिडीओ

आधी देशात लस उपलब्ध करुन द्या, मग परदेशात पाठवून नाव कमवा; हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

संतापजनक! मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लिम मुलाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.