काय सांगता! २६ महिन्यांचा मुलगा विराट कोहली सारखा खेळतोय क्रिकेट, पाहा विडिओ

कधी कधी २, ३ वर्षांची मुलं मोठ्या माणसांना लाजवतील अशा कला करत असतात. आता २६ महिन्यांच्या एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हा मुलगा उत्कृष्ट क्रिकेट खेळताना दिसत आहे.

विराट कोहली सारखा शॉट देखील तो मारत आहे. हा मुलगा झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील असून तो मोठ्या क्रिकेटर सारखा क्रिकेट खेळत आहे. त्याचा विडिओ सध्या व्हायरल होत आहे. तो विराट कोहली सारखा क्रिकेटर होण्याचे स्वप्न बाळगतो.

बोकारो जिल्ह्यातील बिरटांड गांवात राहणारा जयंत कुमारला अगदी वर्षांचा असल्यापासून क्रिकेटचे ज्ञान आहे. तो वर्षाचा असल्यापासून त्याने मोबाईलवर विराटच्या विडिओ बघायला सुरुवात केली होती.

तेव्हा त्याने विराट कोहली सारखी बॅट घेण्याचा हट्ट केला होता. तेव्हापासून जयंत घरासमोर क्रिकेट खेळू लागला. आणि आता तो मोठ्या क्रिकेटरसारखा क्रिकेट खेळतो. जेव्हा त्याचा जन्म झाला होता, तेव्हा त्याच्या पायात थोडी जखम होती. काही दिवस पायावर प्लॅस्टर देखील होते.

तेव्हा देखील तो बॉलच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत होता. तो पहिला शब्द देखील बॉल म्हणून बोलला होता, यामुळे त्याला जन्माताच क्रिकेटचे वेड असल्याचे दिसून येते. आता तो मोठ्या मुलांना देखील आउट होत नाही. तो बॉलिंग देखील करतो.

त्याच्या आईचे स्वप्न आहे की तो मोठ्यापणी क्रिकेटर होऊन त्याचे नाव मोठे करेल. त्याचे आईवडील त्याला क्रिकेटर करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यासाठी ते त्याला प्रेरीत करत असतात. त्याला क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याला ते घेऊन देतात. त्यांना विश्वास आहे की एक दिवस तो विराट कोहली सारखा क्रिकेटर होईल.

ताज्या बातम्या

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने खरेदी केला स्काय व्हिला, किंमत ऐकून बसेल धक्का..

व्हिडिओ काढता काढता महिलेचे तोंड अचानक वाढले अन् ती बनली घोडी; पहा व्हिडिओ

जेव्हा संजय दत्तच्या घरात एके-५६ रायफल सापडली होती तेव्हा काय काय घडले होते? वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.