आश्चर्यकारक! २५ वर्षीय महिलेने एकाच वेळी ९ बाळांना दिला जन्म

अनेकदा आपण एका महिलेने दोन किंवा तीन मुलांचा जन्म दिल्याच्या घटना ऐकल्या आहेत. मात्र जर एका महिलेने एकाच वेळी नऊ मुलांना जन्म दिल्याचे तुम्ही ऐकले तर तुम्हाला खोटे वाटेल. यावर अनेकांना विश्वास बसला नाही, मात्र ते खरे आहे.

मोरोक्कोमधील एका महिलेने एकाच वेळी ९ मुलांना जन्म देऊन सर्वांना चकित केले. आणि सर्व मुलांची तब्येत उत्तम आहे. यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. माली सरकारने २५ वर्षांच्या हलिमा सीजेला ३० मार्चला चांगली देखभाल करण्यासाठी मोरोक्कोला पाठविले.

हलीमाच्या गर्भाशयात ६ मुले आहेत असे वाटले. तरी देखील एकाच वेळी ६ मुलांचा जन्म असामान्य आहे. तसेच ९ मुलांचा जन्म तर आणखीनच असामान्य आहे. मात्र ही मुलं जन्माला आल्यानंतर सर्वांनी आश्चर्यच व्यक्त केले.

येथील एका अधिकाऱ्याने सांगितले की देशात अशा 9 मुलांच्या जन्माची माहिती आमच्याकडे नाही. परंतु मालीच्या आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हलिमाने सीझेरियन शस्त्रक्रियेद्वारे पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला आहे.

मालीचे आरोग्यमंत्री फांटा सिबी यांनी सांगितले की, आई व बाळ निरोगी आहेत. अशा घटना क्वचितच घडत असतात. यामुळे डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.

अशा अनोख्या घटना खूप कमी वेळा घडत असतात. ब्रिटनमधील २१ वर्षीय महिलेने मुलाचे वजन ५ किलो ८०० ग्रॅम होते. या मुलाला यूकेमधील दुसर्‍या सर्वात जड बाळाचा सन्मान मिळाला. या बाळाचे वजन पाहून सर्वांनाचं धक्का बसला.

ताज्या बातम्या

VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला

अदर पुनावालांनी धुडकावली १ अब्ज डॉलरची ऑफर; जाणून घ्या कोणी दिली होती ही ऑफर

या तरुणीने फक्त २९ सेकंदात दोन चोरट्यांना शिकवला धडा; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.