Bharat Bandh On 9th July : केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या (Privatization) धोरणांप्रती आणि नव्या कामगार कायद्यांविरोधात देशभरातील विविध कामगार संघटनांनी एकत्र येत ९ जुलै २०२५ रोजी भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. या बंदमध्ये सुमारे २५ कोटी कामगार सहभागी होणार असून बँकिंग, खाणकाम, विमा, पोस्टल सेवा, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या देशव्यापी आंदोलनात दहा राष्ट्रीय कामगार संघटनांनी (Labour Unions) सहभाग जाहीर केला आहे. त्यांच्यासोबत असंख्य स्थानिक व राज्यस्तरीय संघटनाही या बंदमध्ये सहभागी होतील. कामगार संघटनांचा आरोप आहे की केंद्र सरकारने कामगारविरोधी आणि शेतकऱ्यांविरोधी धोरणे राबवली असून, त्याचा थेट फायदा केवळ उद्योगपतींना (Industrialists) होतो आहे.
काय बंद राहील?
-
बँकांची (Banks) कामकाज व्यवस्था
-
विमा कंपन्यांचे (Insurance Companies) व्यवहार
-
पोस्टल सेवा (Postal Services)
-
कोळसा व खाणीतील (Coal Mining) काम
-
राज्य वाहतूक सेवा (State Transport Buses)
-
राष्ट्रीय महामार्ग व रस्ते विकास प्रकल्प (Highway & Road Construction)
-
सरकारी कंपन्यांचे उत्पादन कार्य (Public Sector Production Units)
काय सुरू राहील?
-
बहुतेक खासगी कंपन्यांचे (Private Sector) काम सुरू
-
रुग्णालये व वैद्यकीय आपत्कालीन सेवा (Hospitals & Emergency Services)
-
खाजगी शाळा व कॉलेज, ऑनलाइन सेवा (Private Schools & Online Services)
बंद का पुकारण्यात आला?
कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांच्याकडे १७ प्रमुख मागण्या मान्य करण्याची विनंती केली होती. मात्र केंद्राकडून यावर कोणताही प्रतिसाद न आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने कामगार परिषद घेतलेली नाही, याचीही संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन कामगार कायद्यांमुळे (Labour Codes) भविष्यात कामगार संघटनांची ताकद कमी होईल, असा आरोप यावेळी संघटनांकडून करण्यात आला. ग्रामीण भागांपासून शहरी भागांपर्यंत सर्व स्तरातील मजूर व कर्मचारी या बंदमध्ये सामील होणार आहेत.