२४ वर्षांपासून बंद लिफ्टच्या आतमध्ये दडून होते हे रहस्य, लिफ्ट उघडताच जे समोर आले, पाहून सगळ्यांचा थरकाप उडाला

एखादी गोष्ट खूप काळासाठी बंद पडली की किडे,मुंग्या,उंदीर असे असंख्य प्राणी त्यात आपले घर करून बसतात. त्यामुळे बऱ्याच काळापासून एखादी गोष्ट बंद असेल तर त्याच्या आत काय असेल हे सांगणे थोडे कठीण असते. अश्या अनेक घटना देखील झाल्या आहेत जिथे अनेक वर्षांनी एखादी गोष्ट दरवाजा असे काही उघडले आणि मृतदेह सापडले.

अशीच एक घटना घडली आहे ती उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील एका रुग्णालयात असा प्रकार घडून आला आहे. रुग्णालयातील एक लिफ्ट, एक दोन नव्हे तर तब्बल २४ वर्ष बंद होती. अखेर लिफ्ट ठीक करण्याचं हॉस्पिटल प्रशासनानं मनावर घेतलं आणि त्याप्रमाणे इंजिनीअर्सनी १ सप्टेंबर रोजी लिफ्ट ठीक केली.

मात्र जसा लिफ्टचा दरवाजा उघडला असता सगळ्यांचे डोळे विस्फारले. लिफ्टच्या दरवाजाच्या मागे एक मानवी सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा सांगाडा कोणाचा? इथे कसा आला? याची अद्याप माहिती समोर आली नाही आहे.

पोलिस याबद्दल अधिक तपास करीत असून संगड्याचा DNA तपासासाठी पाठविण्यात आला आहे. लिफ्ट बंद होती त्या काळात कोणी व्यक्ती बेपत्ता झाले होते का या सर्वांची चौकशीही पोलीस आजूबाजूच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये करीत आहेत.

सांगाडा सापडले ते हॉस्पिटल १९९१ मध्ये चालू झाले असून १९९१ ते १९९७ पर्यंत लिफ्टचा वापर नियमित सुरू होता. मात्र १९९७ पासून लिफ्ट खराब असल्याने बंद पडली. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने एवढे वर्ष लिफ्टकडे दुर्लक्ष का केले?

आतमध्ये एखादा मृतदेह असताना त्यावेळेस हॉस्पिटल प्रशासनाला याबद्दल कसे काय माहीत नाही? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले असून, लिफ्टमध्ये अडकून हा मृत्यू झाला आहे, की लिफ्ट खूप वेळेपासून बंद असल्याचे पाहून कोणीतरी मृतदेह तिथे सोडला याबद्दल देखील पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
रिलेशनशिपमुळे ट्रोल होताच ‘तारक मेहता…’फेम मुनमुन दत्ता भडकली; म्हणाली भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय…
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत..
साताऱ्यात पुन्हा एकदा दोन्ही राजेंच्या समर्थकांत तुफान हाणामारी, अनेकजण गंभीर जखमी
कर्नाटकातील भाजप सरकारने प्राचीन मंदीरावर फिरवला बुलडोझर; मंदीर उद्धवस्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.