नुकतंच अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेत्री महिमा चौधरी यांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचा खुलासा केला होता. यानंतर अभिनेत्री महिमा चौधरीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देण्याच्या प्रवासाविषयी सांगत आहे. (22 years ago, Mahima Chaudhary had a bad time)
पण असाच एक प्रसंग अभिनेत्री महिमा चौधरीच्या(Mahima Chowdhery) आयुष्यात यापूर्वी देखील आला होता. २२ वर्षांपूर्वी अभिनेत्री महिमा चौधरीचा अपघात झाला होता. या अपघातात हजारो काचेचे तुकडे तिच्या चेहऱ्यावर गेले होते. त्यामुळे अभिनेत्री महिमा चौधरीचा चेहरा खूपच खराब झाला होता. त्यावेळी अभिनेत्री महिमा चौधरी एका चित्रपटाचे शूटिंग करत होती.
१९९९ मध्ये अभिनेत्री महिमा चौधरी ‘दिल क्या करें’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल मुख्य भूमिकेत होते. ‘दिल क्या करें’ या चित्रपटाचे शूटिंगला जात असताना अभिनेत्री महिमा चौधरीचा अपघात झाला होता. या अपघातात अभिनेत्री महिमा चौधरीच्या चेहऱ्याला खूप दुखापत झाली होती.
एका मुलाखतीत अभिनेत्री महिमा चौधरीने अपघाताचा हा किस्सा सांगितलं होता. या मुलाखतीत अभिनेत्री महिमा चौधरीने सांगितले की, “मी शूटिंगसाठी घरून निघाले होते. त्यावेळी वाटेत एका दुधाच्या ट्रकने माझ्या कारला धडक दिली. या अपघातात माझ्या कारचा पूर्ण चुराडा झाला होता. या अपघातात माझ्या चेहऱ्याला दुखापत झाली होती.”
“हजारो काचेचे तुकडे माझ्या चेहऱ्यात घुसले होते. त्यामुळे माझा संपूर्ण चेहरा खराब झाला होता. त्यावेळी मला वाटले की मी जिवंत राहू शकणार नाही. त्यावेळी माझ्या मदतीला कोणीही आले नाही. मला रुग्णालयात नेल्यानंतर खूप वेळाने माझी आई त्या ठिकाणी आली. त्यानंतर काही वेळाने अभिनेता अजय देवगण मला भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते”, असे अभिनेत्री महिमा चौधरीने मुलाखतीत सांगितले.
अभिनेत्री महिमा चौधरीने पुढे सांगितले की, “माझ्या चेहऱ्यावर असलेले हजारो काचेचे तुकडे शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर मला डॉक्टरांनी घरातच आराम करण्याच्या सल्ला दिल्या होता. डॉक्टरांनी मला आरशात चेहरा बघण्यास मनाई केली होती. त्यावेळी मला वाटायचे की आता माझे करिअर संपले आहे. मला आता कोणत्याही चित्रपटात काम मिळणार नाही. पण मी स्वतःला सावरले. त्यानंतर मी ‘दिल क्या करें’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले”, असे अभिनेत्री महिमा चौधरीने मुलाखतीत सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या :-
गौतम अदानी आणि प्रिती अदानींना पवारांच्या घरी पाहून सगळेच झाले हैराण; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अजय देवगण सोबत झळकलेल्या अभिनेत्रीवर आली भयंकर वाईट वेळ, चेहऱ्यातून काढल्या होत्या ६७ काचा
प्रचाराला जाण्यास नकार दिल्याने भाजप नेत्याने केली पत्नीची गोळ्या झाडून हत्या, उडाली खळबळ