केसचा निकाल देताना सात महीला व पाच पुरूष न्यायाधीश ढसाढसा रडत होते; असं काय होतं त्या केसमध्ये? वाचा..

ब्रिटीश पर्यंटक ग्रेस मिलान या २२ वर्षीय तरुणीची २ डिसेंबर २०१८ ला न्युझिलंडमध्ये हत्या झाली होती. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आले होते. आता या आरोपीने हत्या केली नाही, तर सेक्स करताना एका अपघातात तिचा मृत्यु झाल्याचे म्हटले होते.

या प्रकरणी न्युझिलंडच्या कोर्टाने आरोपीचा दान फेटाळला आहे. तसेच  त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.  ही शिक्षा देत असताना ज्युरींचे अश्रू  अनावर आले आहे. कारण यावेळी त्यांना आरोपीला शिक्षा देताना ग्रेसच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलावे लागले आहे,

शारीरीक संबंधांवेळी ग्रेसचा गुदमरून मृत्यु झाल्याचा दावा, मारेकऱ्याने कोर्टात केला आहे. हत्येचा आरोपी हा २६ वर्षीय तरुण जेस केम्पसनला आहे. सेक्स करताना चोकींगमुळे ग्रेसने आपले प्राण गमावले आहे, असा दावा जेसने केला आहे. कोर्टाने मात्र या दाव्यावरुन जेम्सला झापले आहे.

जेसने ग्रेसच्या मृत्युचं खापर तिच्यावरच फोडल्याने कोर्टाने जेसला झापले आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं ग्रेसच्या कुटुंबाने स्वागत केले आहे. सेक्स करताना तिने आपल्याला चोक करण्यास सांगितले होते, पण अपघाताने तिचा मृत्यु झाला आहे, असे जेसने म्हटले होते.

जेसचा हा दावा मात्र कोर्टाने फेटाळला आहे. अशा खालच्या पातळीच्या दाव्यांना निकालात काढणाऱ्या घरगुती हिंसाचार विधेयकातील कलमांबद्दल ग्रेसच्या कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे.

दोघांची टिंडर या डेटिंग ऍपवर ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना भेटले होते. त्यानंतरच तिची हत्या झाली होती. पोर्स्टमार्टम अहवालात मृत्युपुर्वी गळा दाबल्याचे लिहिलेले होते. त्यामुळे अपघातात नाहीतर तिची हत्याच करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी जेसवर बलात्कार, लैंगिक हिंसा, जीवे मारण्याची धमकी असे एकून ९ खटले दाखल झाले होते.

या प्रकरणी जेस केम्पसनला २१ फेब्रुवारी २०२० रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच त्याला १७ वर्षे तरी त्याला पॅरोल मिळणार नाही. हा निकाल सुनावताना सात महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असलेल्या ज्युरींपैकी अनेकांचे अश्रू अनावर आले होते.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! क्रिकेटपटू के एल राहूलची प्रकृती बिघडली; उपचारासाठी तातडीने दवाखान्यात हलवले
भल्याभल्यांना घाबरवणाऱ्या या व्हिलनची शेवटच्या दिवसांत खूप वाईट अवस्था झालती, ओळखूही येत नव्हता
‘आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करा, व्हायरस पसरावयचं थांबवा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.