धक्कादायक! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीच्या घटनेत २२ जणांचा मृत्यू

नाशिक । नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सध्या राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली.

ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता. यामुळे सर्वांची एकच पळापळ झाली. मात्र २२ जणांचा मृत्यू झाला.

व्हेंटिलेटरवर असलेल्य़ा रुग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. ही एक खाजगी कंपनीची टाकी आहे. रिफिल करण्याकरता आणि मेंटेनन्सकरता टॅंकर आला होता. यावेळी ही घटना घडली.

दरम्यानच्या या काळात झालेल्या विस्कळीतपणामुळे ही घटना घडली, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. याबाबत राज्य सरकारने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मृत व्यक्तींच्या घरच्यांना मदत केली जाणार आहे.

या घटनेनंतर मृत व्यक्तींच्या एकच आक्रोश केला. काय घडले आहे. हे अनेकांना समजत नव्हते. यावेळी अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या घटनेचे दुःख व्यक्त केले.

ताज्या बातम्या

गॅंगस्टर गजा मारणेला मदत केल्याप्रकरणी पुण्यातील भाजपच्या माजी खासदाराला अटक

पुण्यातील ‘या’ मोठ्या कंपनीने चीनला कंपनी विकून १४१९ कामगारांना केले कमी

माणूसकीला सलाम! कोरोनाच्या संकटात भीक मागून या भिक्षूकाने दान केले ९० हजार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.