हृदय हेलावून टाकणारी घटना; ‘आईला कंपनीत जाऊन येतो म्हणाला अन्…’

मुंबई | देशाला कोरोना लस पुरविणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आग लागल्याची बातमी लागल्याचे कळताच काळजाचा ठोका चुकला. दुर्घटना घडली तेथील दोन मजले वापरात होते. तिसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे. कोव्हीडची लस जिथे बनवली जाते त्या विभागाला आगीचा फटका बसला नाही.

मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाखांची मदत ‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून जाहीर करण्यात आली आहे.

या दुर्घटनेट प्रतीक पाष्टे या २१ वर्षीय मुलाने आपला जीव गमावलेला आहे. आजारी वडील, चहाची गाडी चालवणारी आई यांना आधार देत प्रतीक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करत होता. मात्र डिग्रीला प्रवेश घेण्याआधीच त्याचा प्रवास संपला. नेहमीसारखा सकाळी कामावर जाणारा प्रतीक घरी परतलाच नाही.

प्रतीकच्या अचानक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत बोलताना मामा गणेश घाणेकर  म्हणाले की, ‘त्याच्याकडे असलेल्या गोष्टींवरून मृतदेह ओळखता आला. काय झालंय समजत नव्हतं. अखेर बातम्या बघून प्रतीक नाही हे समजलं. सकाळी निघताना मी कंपनीत जाऊन लवकर येतो सांगणारा प्रतीक असा कायमचा जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते’.

महत्त्वाच्या बातम्या
धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…
नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत उडाली खळबळ; म्हणाले…
सरकारच्या अडचणीत वाढ! कायदा स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; उचलले मोठे पाऊल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.