२०१९ ची विधानसभा निवडणूक फिक्स होती! काॅंग्रेस, भाजप, शिवसेना तिघांची मिलीभगत झाली उघड

आनंदवाडी-गौर (ता.निलंगा) येथे एका विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. ‘लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहराच्या जागेच्या बदल्यात ‘फिक्सींग’ झाली होती’, असा आरोप त्यांनी केला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना व भाजपा यांची युती होती. यावेळी काँग्रेसने दिवंगत, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली होती. धीरज देशमुख यांचा घवघवीत मताधिक्याने विजय झाला होता. या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसने फिक्सिंग केल्याचा आरोप निलंगेकरांनी केला आहे.

“लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेने मुंबई येथील एका जागेसाठी फिक्सींग केली होती. तेथे दोन नंबरवरती ‘नोटा’ राहिले. त्यामुळे मतदारांचा अनादर शिवसेनेने केला आहे.” असा गौप्यस्फोट पाटलांनी केला आहे.

“लातूर ग्रामीणची जागा अमित देशमुख यांना देवून देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा खुन केला. ही जागा भाजपकडे होती. ऐनवेळी ही जागा सेनेला सुटली. या जागेसाठी सेनेने दिलेला उमेदवार प्रचाराला फिरकला देखील नाही.” असाही आरोप त्यांनी केला आहे.

“हे राजकारणातले सेटींग आहे. अमित देखमुख यांचे बंधू धीरज देशमुख यांनी ही जागा लढवली आणि विजयी झाले. मात्र, हा विजय कमालीचा एकतर्फी होता. फडणवीसांनी लातूर ग्रामीणची भाजपची विनिंग सीट शिवसेनेला सोडून धीरज देशमुख यांना आमदार केलं”. ही राजकारणातली सर्वात मोठी फिक्सिंग असल्याचाआरोप निलंगेकर यांनी केला आहे.

बेरोजगारांना लाॅटरी! कॅगमध्ये ११ हजार जागांसाठी मोठी भरती; ‘असा’ करा अर्ज

आंदोलन चिघळवणाऱ्या भाजपच्या दीप सिंधुला शेतकऱ्यांनी पळवून लावले; पहा व्हिडीओ

दिल्ली हिंसाचारावर अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.