महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शरद पवारांचा भाजपला होता पाठिंबा; वाचा सत्ता स्थापनेची इनसाईड स्टोरी

२०१९ च्या निवडणुक आठवतीये? किती नाट्यमय परिस्थितीत महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले. पण यासगळ्यामागचे सत्य आता प्रसिद्ध लेखिका प्रियम गांधी यांनी एका पुस्कातून समोर आणले आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या नाट्यावर लिहलेल्या पुस्तकावरून राजकीय वातारवरण तापले आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शरद पवारांचा भाजपला पाठिंबा होता, असा गौप्यस्फोट या पुस्तकातून करण्यात आला आहे.

२०१९ च्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातील राष्ट्रवादीचे दोन ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले होते. त्यांनी शरद पवार यांना भाजपाला समर्थन द्यायचे आहे असे संकेत दिले. देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित याबाबत अमित शाह यांना माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमित शाह यांच्या निवासस्थानी त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह हे उपस्थित होते,” असा दावा प्रियम गांधी यांनी ट्रेडिंग पॉवर या पुस्तकात केला आहे.

एवढंच नाही तर या बैठकीत शरद पवारांनी स्वत: अमित शहांना भाजपासोबत येण्यास तयार असल्याचं सांगितलं, बैठकीत मुख्यमंत्री कोणाचा असेल आणि मंत्रिमंडळ फॉर्म्यूला कशा असेल यावर सविस्तर चर्चा झाली, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर लोकांची स्थितीचा आढावा पाहून महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे असं सांगत राष्ट्रवादी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर करणार होते.

पुढे २८ नोव्हेंबर २०१९ तारखेला शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, त्याचवेळी दुसरीकडे शिवसेना-काँग्रेसही सरकार बनवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र शरद पवारांच्या मनात कधी काय असेल सांगता येत नाही, शिवसेना-काँग्रेस यांच्यासोबत सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे जास्तीत जास्त अधिकार येतील यादृष्टीने शरद पवारांनी कदाचित विचार करून पुन्हा मन बदललं असावं, असा दावा लेखिकेने पुस्तकात केला आहे. या पुस्तकात असे अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

एक दोन नव्हे तर तब्बल २२ वेळा सौरव गांगुलीला करावी लागली कोरोना टेस्ट; जाणून घ्या कारण..

आता नरेंद्र मोदींना मराठा समाज दाखवणार ‘एक मराठा लाख मराठा’, पुण्यात अडवणार मोदींचा मार्ग

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.