२०११ ला पाकिस्तानी खेळाडूंना ताज हॉटेलमध्ये थांबू देण्यासाठी तयार का नव्हती भारतीय टीम?

२ एप्रिल २०११ ही तारीख भारतीयांसाठी खुप महत्वाची तारीख आहे. या तारखेची वाट त्यावेळी भारतातील प्रत्येक माणूस खुप अतुरतेने करत होता. १९८३ पासून पुर्ण २८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात ही तारीख आली.

या दिवशी भारताने दुसरा विश्वचषक जिंकला होता. त्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने वर्ल्ड कप जिंकला. १० वर्षे झाली तरी या क्षणाला कोणताच भारतीय विसरू शकला नाही. या खास प्रसंगी इंडियन एक्सप्रेसने वर्ल्ड कप २०११ मध्ये टीम इंडियाचे मेंटल हेल्थ फिटनेस कोच पॅडी अप्टन यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीत पॅडी यांनी अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. पण या लेखात आम्ही भारत-पाकिस्तान उपांत्य फेरीपूर्वी पॅडीने सांगितलेला एक महत्वाचा किस्सा सांगणार आहोत जो सगळ्यांना माहीत असला पाहिजे.

पॅडी यांनी सांगितले की, २०११ च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारताला पाकिस्तानचा पराभव करायचा होता. कारण सामना जर पाकिस्तानने जिंकला तर त्यांना मुंबईतील ताज हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार होती हे भारताला होऊन द्यायचे नव्हते.

या हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि अनेक निर्दोश लोक यामध्ये मारले गेले होते. अनेक पोलिस अधिकारी यावेळी शहीद झाले होते. पॅडी अप्टन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ही सर्व माहिती दिली.

भारत आणि पाकिस्तानमधील रायव्हलरी ही प्रेक्षकांसाठी खुप महत्वाची होती आणि त्यांची संख्याही खुप जास्त होती. पाकिस्तानमधील समर्थक आणि भारतातील समर्थक यांच्यामध्ये किती संघर्ष होतो हे सगळ्यांनाच माहिती आहे.

पॅडी पुढे म्हणाले की, खेळाडूंमध्ये असे कसलेही वाईट किंवा एकमेकांबद्दल द्वेष पसरवणारे वातावरण नव्हते पण यामागील कारणही तितकेच मोठे होते. हा पाकिस्तानविरुद्धचा आमच्यासाठी एक साधारण सामना होता, ज्यासाठी भारतीय संघाला वेगळ्या प्रेरणेची गरज नव्हती.

तरीही, पॅडी यांनी कबूल केले की खेळाडूंवर राजकीय दबाव नक्कीच होता. ते म्हणाले, या सामन्यावर बरेच वेगळे राजकीय दबाव होते. याबद्दल कोणीही बोलत नाही, परंतु प्रत्येकास याबद्दल माहिती आहे. अशा परिस्थितीत आम्हाला माहिती होतं की जर भारत हरला तर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीसाठी मुंबईला जाईल आणि ताज हॉटेलमध्ये थांबेल.

ज्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. मी जास्त काही बोलत नाही कारण याचा अर्थ काय हे आपल्या सर्वांना स्पष्टपणे माहित आहे. भारताने पाकिस्तानला जिंकू दिले आणि मग ते जाऊन ताज हॉटेलमध्ये थांबू शकतील हे मुळीच त्यांना मान्य नव्हते.

आ कारणामुळे भारतीय संघावर वेगळ्या प्रकारचा दबाव होता. त्यांना हा सामना जिंकणे भाग होते. २०११ वर्ल्ड कप भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये खेळला गेला. ज्याचे सेमी फायनल मोहाली येथे पार पडले.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २६० धावा केल्या. सचिन पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध ८५ धावांची खेळी करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. यानंतर भारताच्या पाच गोलंदाजांनी २-२ विकेट घेत पाकिस्तानला अवघ्या २३० धावांवर रोखले.

सामना जिंकून भारताने मुंबईतच ताज हॉटेल गाठला, अशी माहिती पॅडी यांनी दिली. तर मग तुम्ही समजू शकता की त्यावेळी भारताच्या संघावर किती दबाव आला असेल. तसे म्हणायचे झाले तर भारताचा संघ त्यावेळी मजबूत होता त्यामुळे त्यांनी सहज पाकिस्तानला हरवले.

पण त्यांच्यावर राजकीय दबावही होता. तो सामना कोणीही विसरू शकत नाही. आधीच देश ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यामुळे हादरला होता. जर भारताने हा सामना गमावला असता तर भारतातील वातावरण खुप वाईट प्रकारे तापले असते यात शंका नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
माधुरी दीक्षितने शेअर केला विना मेकअपचा फोटो, फोटो पाहून चाहत्यांना विश्वासच बसेना, म्हणाले..
अवघ्या तीन गुंठ्यांत फुलवला ७५ प्रकारच्या पिकांचा शेतमळा, भांगे कुटुंबियांच्या अनोख्या शेती मॉडेलची चर्चा
कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना किती मिळतो पगार? उत्तर प्रदेश आहे तिसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र….
“महाराष्ट्राच्या जनतेला उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.