“संसदेसाठी, पुतळ्यांसाठी २० हजार कोटी, मग लसीकरणाला ३० हजार कोटी का नाहीत?”

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी लसीकरणावरून केंद्राला पत्र लिहिले होते, मात्र अद्यापही त्यांना उत्तर मिळाले नाही. यामुळे त्या चांगल्याच संतापल्या आहेत.

मोदी सरकार नवीन संसद उभारण्यासाठी आणि पुतळे उभारण्यासाठी २०,००० कोटी रुपये खर्च करत असताना लसीकरणासाठी ३०,००० कोटी का दिले जात नाहीत. मोदी सरकारने माझ्या पत्राला अजून का उत्तर दिले नाही, असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

ममता बॅनर्जीं यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र लगेच सहकार्य न झाल्याने ममता यांनी त्यांच्यावर टीका केली.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी पीएम केयर फंड कोठे आहे? मोदी देशातील तरुणांचा जीव धोक्यात का घालत आहेत? त्यांच्या नेत्यांनी कोव्हिड हॉस्पिटलला भेट दिली पाहिजे, ते इथे येऊन कोव्हिड पसरवत आहेत, असेही ममता यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम बंगालचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या सतत पाठिंब्याची मी अपेक्षा करते. मी माझ्या पूर्ण समर्थनासह आशा व्यक्त करते, की एकत्रितपणे आपण कोरोनाला लढा देऊ आणि केंद्र- राज्यांच्या संबंधात नवीन आदर्श घालून देऊ, असे म्हटले होते.

काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालला निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला मोठा धक्का देत राज्यातील सत्ता काबीज केली. आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

ताज्या बातम्या

ना रेमडेसिवीर, ना व्हेंटिलेटर, फक्त दोन ड्रॉप देऊन २९ हजार कोरोना रुग्ण बरे; कल्याणच्या डॉक्टरचा दावा

आज आमच्या दारात देव आला; आमदार निलेश लंके यांचा करमाळावासियांनी पाय धुवून केला सत्कार

“पवारसाहेब तुम्ही बारमालकांसाठी सवलत मागताय, तसेच एखादे पत्र शेतकऱ्यांसाठी पाठवा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.