२००० रुपयांच्या नोटांबद्दल मोदी सरकारचा खुलासा, वाचा धक्कादायक माहिती

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी जाहीर केली. यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या. दरम्यान आता दोन हजाराच्या या नोटांबाबत सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

चलनात २००० रुपयांच्या नोटांची संख्या कमी झालेली आहे. तर गेल्या दोन वर्षांत २००० रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात आली नसल्याची माहित केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. याबाबतच्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

आकडेवारीनुसार, २० मार्च २०१८ पर्यंत २००० रुपयांच्या ३३६.२ कोटींच्या नोटा चलनात आल्या. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी २००० रुपये किमतीच्या २४९.९ कोटींच्या चलनी नोटा होत्या. त्या अनुक्रमे २.०१ टक्के झाल्या आहेत.

याबाबत अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत केल्यानंतर सरकार विशिष्ट मूल्याच्या नोटा छापण्याचा निर्णय घेते. तसेच एप्रिल २०१९ पासून दोन हजार रुपयांच्या नोटांची प्रिटिंग बंद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण कमी झाले आहे. तर दुसरीकेडे त्याची प्रिटिंग थांबवण्यात आली आहे. त्यामुळे नोटांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये भविष्यात या नोटा बंद होणार का? असा मुख्य प्रश्न विचारला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! ३०० रुपयांच्या चप्पला विकत घेऊन या बहिणी कमवताय लाखो रुपये, जाणून घ्या कसं
आमिर खानने घेतला धक्कादायक निर्णय; कायमचा रामराम ठोकत म्हणाला..
शेतकऱ्याचा नाद खुळा! बडीशेपच्या शेतीत केला भन्नाट प्रयोग, आता दुप्पट उत्पन्नासह करतोय लाखोंची कमाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.