शेतकऱ्याने लढवली भन्नाट शक्कल! आता कमवतोय एकरी ३ ते ४ लाखांचे उत्पन्न

दुष्काळग्रस्त भागातील नांदगाव तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी घनश्याम बोरसे यांनी एकरी तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न कामावण्याचे सूत्र शोधले आहे. नांदगाव तालुका म्हटलं तर हलक्या प्रतीची शेती तिथे केली जाते.

घनश्याम यांनी सोयीनुसार फोन एकर क्षेत्राचे सपाटीकरण करून एका एकरात एकत्रित हळद, अद्रक, मिरची, गवार आणि पपईचे पीक घेतले आहे. जर चार पाच प्रकारची पिके घेतली तर कोणत्या तरी एका पिकाला चांगला भाव मिळाला की वर्षाची कमाई निघून जाते.

त्यांनी हळदीचे आणि अद्रक यांचे पीक आधुनिक तंत्रज्ञान वापरून घेतले आहे त्यानुसार दोन महिन्यात त्यांना चांगले उत्पादन मिळण्याची अशा आहे. झेंडूच्या फुलांपासून त्यांना दसऱ्याला ५० हजार उत्पन्न मिळाले.

मिर्चीपासून वीस हजार आणि गवारीपासून पंचवीस हजार त्यांना मिळाले आहेत. ते सतत काहीतरी नवीन प्रयोग करत असतात. त्यांनी शेताच्या बांधावर पपईची झाले लावली आहेत. एका झाडाला साधारण दहा ते पंधरा पपया लागल्या आहेत.

असे सगळ्या पिकांतून त्यांना वर्षाला चार ते पाच लाख उत्पन्न मिळते. प्रतिकूल परिस्थितीतही कमी क्षेत्रात चांगले पीक आणि चांगले उत्पन्न कसे येईल हे डोक्यात ठेवून एक एकरात एकत्रित पाच पिके त्यांनी घेतली. सर्व शेतकऱ्यांनी हे तंत्र वापरायला काही हरकत नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.