मोठी बातमी! २ हजारांची नोट बंद होणार.? १० रुपयांच्या सिक्क्यांबाबत RBI ची महत्वाची माहिती

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून चलनातील काही पैसे दैनंदिन व्यवहारात वापरताना अनेकदा ते स्वीकारले जात नव्हते. यामुळे अनेकदा अडचणी येत आहेत. या आणि इतर गोष्टींवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी त्यांचा वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे.

यामध्ये रिझर्व्ह बँकेने आता आर्थिक व्यवहारासाठी कोणत्या नोटा आणि किती सिक्के वापरात आहेत. ते स्पष्ठ केले आहे. किती रुपये आणि किती शिक्के जारी केले आहेत त्याचीही माहिती आरबीआयने दिली आहे. यामुळे आता हा संभ्रम दूर होणार आहे.

बाजारात २ हजारांच्या नोटेवर प्रतिबंध लावण्यात आले नाहीत. आरबीआयने २ हजारांच्या नोटेवर बंदी आणली आहे अशी अफवा काही दिवसांपासून पसरली होती. यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.

सध्या बाजारात २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपये नोट जारी केल्या आहेत. १० रुपयांचे शिक्के गेल्या काही दिवसांपासून बाजारात घेण्यासाठी टाळाटाळ केली जाते. यामुळे हे सिक्के चालू आहेत की बंद आहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

त्याचसोबत बाजारात ५० पैसे शिक्के चलनात नाही परंतु आरबीआयने याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे.
आता बाजारात ५० पैसे, १ रुपये, २, ५, १० आणि २० रुपयांचे शिक्के चलनात आहेत. रिझर्व्ह बँकेकडून ते जारीही केले जातात. कोणतेही सिक्के चलनातून बाहेर केले नाहीत.

यामुळे हे सिक्के अजूनही बाजारात चालणार आहेत. सध्या बाजारात ५०० आणि २ हजारांच्या बँक नोटा ८५.७ टक्के चलनात आहेत. म्हणजे देशात जितके बँक नोट आहे त्यात ८५.७ टक्के ५०० आणि २००० बँक नोटा आहेत.

त्यानंतर १० रुपयांच्या नोटांचे प्रमाण जास्त आहे. त्या बाजारात २३.६ टक्के चलनात आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ९.७ टक्क्यांनी नोटांच्या चलनात घट झाली आहे. यामुळे यावर देखील मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे.

आतापर्यंत सिक्युरिटी प्रिटिंगवर एकूण ४ हजार १२ कोटी रुपये खर्च झालेत. मागील वर्षी जुलै २०१९ ते जून २०२० पर्यंत प्रिटिंगवर ४ हजार ३७७ कोटी रुपये खर्च झालेत. २०२० ते २०२१ कालावधीत २ लाख ८ हजार ६२५ बनावट नोटा सापडल्या आहेत.

ताज्या बातम्या

सावरकर जयंतीनिमीत्त राज ठाकरेंचे खास अभिवादन; धर्मग्रंथ व देशउभारणीबाबत शेअर केले वेगळेच विचार

चंद्रकांत पाटील ही भाजपने मराठा समाजाशी केलेली गद्दारी नाही का? गंभीर पुरावे उघड करत ‘या’ नेत्याचा आरोप

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याचे भाजपशी थेट संबंध; सर्वच पुरावे झाले उघड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.