शेतकऱ्यांना २ रुपये दरवाढ! गोकुळ जिंकताच सतेज पाटलांची मोठी घोषणा

कोल्हापूर । सर्वांचे लक्ष लागलेल्या गोकुळ दुधसंघाच्या निवडणूकीचा निकाल काल जाहीर करण्यात आला. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने मोठा विजय मिळवला. यामुळे सत्ताधारी महाडिक गटाला मोठा धक्का बसला.

निकालानंतर काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली. त्यांनी शेतकऱ्यांना थेट २ रुपये दरवाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

यावेळी सतेज पाटील म्हणाले, आता दूध उत्पादकांच्या मालकीचा हा दूध संघ झाला आहे. दूध उत्पादकांनी चांगले यश मिळवून दिले आहे. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो.

हा दूध संघ कोणाच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपली आहे, काल कोणी काय केलं, यावरून आम्ही निवडून आलोय. आता नवा अजेंडा असणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवडणुकीत २१ पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला १७ जागांवर विजय मिळाला. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ ४ जागा मिळाल्या आहेत. आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आली.

आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार असून, आमच्या शब्दात कोठेही मागे पडणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही २ रुपये दर वाढवून देणार आहोत. प्रस्थापित व्यवस्थेतील उणिवा दूर करायच्यात, आम्ही मोठी धडक दिली आहे.

आमच्या चार जागा गेल्या याचे पॅनल प्रमुख म्हणून दुःख होते आहे, पण लोकशाही आहे. मतदार हा आपला बाप आहे. निवडणुकीत शब्द अपशब्द वापरले गेले होते, ते व्हायला नको होते, असेही सतेज ऊर्फ बंटी पाटील यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

पाटील आणि मुश्रीफ गटाने गोकुळ दूध संघाची निवडणूक जिंकली, महाडीक गटाच्या सत्तेला सुरूंग

शिक्षकांनी हाती घेतला समाजसेवेचा वसा; कोरोना रुग्णांसाठी उभारलं ७० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर

हार घालताना नवरीची ही छोटीशी मागणी पुर्ण करु शकला नाही नवरदेव; नवरीने लग्नालाच दिला नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.